पुणे : स्वर्गीय सौैंदर्याची अनुभूती देणा-या, सौैंदर्य द्विगुणित करणा-या आणि व्यक्तिमत्त्वाला अनोखी झळाळी देणा-या नावीन्यपूर्ण असा हिरेजडित दागिन्यांचा आविष्कार अनुभवण्याची संधी पुणेकरांना येत्या शुक्रवारपासून (१७ नोव्हेंबर) मिळणार आहे. शनिवारपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. ख्यातनाम ज्वेलरी डिझायनर पूर्वा दर्डा-कोठारी व मुंबईचे प्रसिद्ध हिरे व्यापारी हर्निश शेठ यांचे इंट्रिया प्रदर्शन शुक्रवारपासून सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल जे. डब्ल्यू. मॅरिएट येथे सुरू होत आहे.सकाळी साडेदहा वाजता यूएसके फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे, उद्योजिका रितू छाब्रिया, वर्षा चोरडिया, मिशेल पूनावाला आणि युवराज ढमाले कॉर्पचे अध्यक्ष युवराज ढमाले यांच्या हस्ते उद्घाटन होईल. ‘लोकमत एडिटोरिअल बोर्डा’चे चेअरमन विजय दर्डा, पूर्वा दर्डा- कोठारी, हर्निश शेठ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हिºयाचे महिलांना कायम आकर्षण असते. हिरा हा सौंदर्याचे, कलात्मकतेचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे. आधीच मोहक असलेल्या हिºयाला पैलू पाडून कलात्मक दागिने तयार केले तर कुणीही त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहूच शकत नाही. याच हिरेजडित दागिन्यांनी पुणेकरांना प्रेमात पाडले आहे. त्यांच्यासाठी ‘इंट्रिया’ या प्रदर्शनात हिरे, पाचू, माणिक यांचे आकर्षक दागदागिने, कर्णफुले, बारीक कलाकुसरीने नटलेले नेकलेस, ब्रेसलेट, कडे, पेंडंट्स असे वैविध्यपूर्ण दागिने पाहण्यास मिळणार आहेत. अगदी पारंपरिक दागिन्यांपासून ते इंडो-वेस्टर्न, पार्टी वेअर अशा स्वरूपाचे दागिने या प्रदर्शनात सादर करण्यात येणार आहेत. प्रदर्शनात व्हाईट गोल्ड, यलो गोल्ड आणि पिंक गोल्डने तयार केले बहुसंख्य दागिने झळकणार आहेत. यात इअररिंग्ज, रिंग्ज, कंठहार, कफलिंग्ज आणि ब्रायडल सेट्स यांचा समावेश आहे. यासोबतच बर्मीस, रेड रुबीज (माणिक) आणि ग्रीन इमरलँड्स (पन्ना) आदी वैविध्य पाहायला मिळणार आहे. शुक्रवार आणि शनिवारी सकाळी १०़३० ते रात्री ८ या वेळात जे़ डब्ल्यू़ मॅरियटमध्ये पहिल्या मजल्यावर प्रदर्शन खुले राहील़व्यक्तिमत्त्व व स्वभावाला साजेशा दागिन्यांची रचना-नेत्रदीपक, उत्कृष्ट कलाकुसर, नक्षीकाम असणाºया दागिन्यांची भुरळ गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पुणेकरांना पडते.हिºयांच्या प्रेमी पुणेकरांसाठी ‘इंट्रिया’ या दागिन्यांचे प्रदर्शन पुन्हा सज्ज होत आहे.व्यक्तिमत्त्व आणि स्वभाववैशिष्ट्ये लक्षात घेऊन दागिन्यांची रचना करण्यात आली आहे.
‘इंट्रिया’त हिरेजडीत आविष्कार: आजपासून दागिन्यांचे प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 6:10 AM