राष्ट्रवादीतील नऊ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीतील फुटीचे प्रकरण आता केंद्रीय निवडणूक आयोगात गेले आहे, या प्रकरणी ६ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, यापूर्वी शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून राज्यभरात सभा सुरू आहेत. शरद पवार आता मंचर येथे सभा घेणार असल्याचे बोलले जात आहे. या सभेसंदर्भात आता मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
राष्ट्रवादीत फूट पडल्याचे निवडणूक आयोगाने केलं मान्य; ६ ऑक्टोबरला दोन्ही गटांना बोलावलं
दिलीप वळसे पाटील म्हणाले, शरद पवार यांची सभा मंचर येथे झाली तर माझे कार्यकर्ते जातील आणि मीही त्या सभेला जाईल, बघू अजून त्यांची सभा होत्या का, असंही वळसे पाटील म्हणाले. निवडणूक आयोग काय निर्णय देईल तो सर्वांनी मान्य करावा लागणार आहे, असंही वळसे पाटील म्हणाले.
आज पुण्यात वसंतदादा साखर संघ येथे बैठक होती. या बैठकीसाठी राज्यभरातील नेते उपस्थित होते, यावेळी खासदार शरद पवारांचीही उपस्थिती होती. या बैठकीला अजित पवार गैरहजर होते, यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या.
६ ऑक्टोबरला दोन्ही गटांना निवडणूक आयोगाने बोलावलं
राष्ट्रवादीतील ९ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली, यात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे दिसत आहे. आता राष्ट्रवादीतील फुटीचे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेले आहे. पक्षातील खासदार शरद पवार गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला ६ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने बोलावलं आहे. यामुळे आता पक्षावर नेमका कोणता गट दावा सांगणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. आता निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीत फूट पडल्याचे मान्य केलं असून दोन्ही गटांना ६ ऑक्टोबर रोजी सुनावणीसाठी बोलावलं आहे.
निवडणूक आयोगात ३ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीत पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीतील दोन्ही गटाकडून पक्षावर आणि चिन्हावर दावा सांगितला आहे. यामुळे आता निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना सुनावणीसाठी ६ ऑक्टोबर रोजी बोलावले आहे.