शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

मैं तो अभी अठरा बरस का हूँ; पं. हरिप्रसाद चौरसिया यांची मिश्कील टिप्पणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 4:10 AM

२,७०० किलो धान्य केरळला पाठविणार

पुणे : वयाची ८० वगैरे संख्या मी पाहत नाही, ‘मैने अभी अपना जीवन शुरू किया है, मैं तो अभी १८ साल का हूँ। मला माझ्या वयाची आठवण करून देऊ नका. जेव्हा मला वाटेल तेव्हा मी वय सांगेन. लोग मुझे ८० बरस का कहते हैं तो मुझे मजा नहीं आता,’ अशी मिश्कील टिप्पणी करीत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी सभागृहात हास्याची कारंजी उडवली.वंदेमातरम् संघटनाकृत युवा वाद्य पथक, शिवसाम्राज्य पथक, शिववर्धन पथक यांच्या वतीने महाराष्ट्रातील विविध पथकांच्या वाद्याचे एकत्रित अभिनव पूजन पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते झाले. या वेळी वयाची ८० वर्षे पूर्ण केल्याबद्दल पं. हरिप्रसाद चौरसिया यांची धान्यतुला करण्यात आली. जमा झालेले २,७०० किलो धान्य केरळ पूरग्रस्तांसाठी अरभाट फिल्मसकडे सुपूर्त करण्यात आले.या प्रसंगी महापौर मुक्ता टिळक, तालयोगी पं. सुरेश तळवलकर, प्रसिद्ध तबलावादक तौफिक कुरेशी, पं. विजय घाटे, प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया, नगरसेविका गायत्री खडके आणि वैभव वाघ हे उपस्थित होते.पुणेकरांनी केलेली धान्यतुला आणि दिलेल्या सन्मानाबद्दल पं. चौरसिया यांनी कृतज्ञता व्यक्त केली. पुण्यात कलाकारांवर एवढे प्रेम करणारे लोक आहेत. त्यामुळे नोटाबंदी वगैरेसारख्या प्रश्नातून पुण्यात कधीच कलियुग येणार नाही. आजचा क्षण हा कायम स्मरणात राहील. एका कलाकाराचा आदरसन्मान कशा प्रकारे करायला हवा, ही गोष्ट नव्या पिढीला कळाली पाहिजे. आज ज्या वाद्याने कलाकाराला मोठे केले, त्या वाद्याचीदेखील पूजा केली पाहिजे. कारण या वाद्यामुळेच कलाकाराची ओळख निर्माण होते, असे सांगून ते पुढे म्हणाले, ‘‘पूर्वीच्या काळात बासरी जत्रांमध्ये वाजवली जायची. हे वाद्य असे आहे, की त्याची किंमतही जास्त नाही. बासरी वाजवायला जरी सोपी वाटत असली, तरी त्यात मेहनत खूप आहे. ती ट्यून करून वाजवणे अवघड आहे. लय आणि सूर व्यवस्थित ऐकण्यासाठी कान तयार पाहिजेत.’’फ्युजनचा अर्थ कळेनासंगीतातील ‘फ्युजन’ प्रकाराकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहता? असे चौरसिया यांना विचारले असता त्यांनी फ्युजनचा अर्थ अजूनही कळाला नसल्याचे सांगितले. फ्युजनमध्ये भारतीय कलाकार व परदेशी कलाकार एकत्रितपणे वाजवतात; पण परदेशी कलाकारांना भारतीय संगीत वाजवायला जास्त आवडते. मी आजही शिष्यांकडून शिकतो. या जन्मातही विद्यार्थी राहण्याची इच्छा असल्याचे त्यांनी नम्रपणे सांगितले.

 

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरPuneपुणे