पुणे : राज्यात पेट्रोल, डिझेलच्या दरात लक्षणीय वाढ झाली असून शंभरीही ओलांडली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशालाही चांगलीच झळ बसू लागली आहे. विरोधी पक्षाकडून तर इंधन आणि गॅस दरवाढीविरोधात आंदोलन, निदर्शने केली जात आहेत. यासंदर्भांत अजित पवारांना (Ajit Pawar) प्रश्न विचारला असता दादांनी भडकून उत्तर दिल आहे.
''माझ्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर वाढले नाहीत. केंद्राने दर कमी केला कि आपोआप दर कमी होतील असं दादा यावेळी म्हणाले आहेत. पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.''
पवार म्हणाले, दिवाळीनंतर १०० टक्के क्षमतेने थिएटर सुरू करण्याचा विचार आहे. तसेच गेल्या ९ दिवसांत लसीकरणात वाढ झाली आहे. राज्यात १० कोटींपेक्षा जास्त लसीकरण झाले आहे. लस घेऊनही ६० वर्षांवरील नागरिकांमध्ये कोरोनाची लागण होत असल्याचे आढळले. पुणे मेट्रोसाठी 'नागपूर पॅटर्न' राबविला जाणार. पुणे मेट्रोसाठी उभारण्यात येणाऱ्या पुलाचे काम दिवाळीच्या आसपास सुरू होईल असे पवार यांनी सांगितले.
तपासात जे काही निष्पन्न होईल त्यानुसार कारवाई होईल
भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खोटा असून वेगवेगळ्या यंत्रणांनी चौकशी करून काहीही उपयोग नाही. तसेच सध्या खोटी आकडेवारी दाखवून आरोप केले जात आहेत. एनसीबी प्रकरणात पार्थ पवार यांचे नाव घेतलं जातं आहे यावर बोलताना पवार म्हणाले, नियम कायदा सर्वांना सारखा आहे. त्यामुळे तपासात जे काही निष्पन्न होईल त्यानुसार कारवाई होईल. मागील काही कळत नकळत मोठमोठ्या व्यक्तीचे नाव घेण्याचे प्रकार सुरू झाले.
नवाब मलिक (Nawab Malik) प्रकरणात अजित पवारांचे नो कमेंट
''नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली, त्यांच्या कुटुंबियांना बोगस म्हटले त्यावर विचारले असता उत्तर देण्याचे अजित पवारांनी टाळले. नो कमेंट, म्हणत मला यावर बोलायचं की नाही हे ठरवण्याचा अधिकार असल्याचं त्यांनी म्हंटलय.''