शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

"त्या’ निर्णयाची अजिबात खंत वाटत नाही..." अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीची कबुली

By श्रीकिशन काळे | Published: September 22, 2023 3:05 PM

मराठीमध्ये काम करायला उत्सूक!

पुणे : ‘‘मी माझ्या करीअरच्या एकदम सर्वोच्च स्थानावर असताना लग्न करून अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. एक तर लोकं सर्वोच्च स्थानावर असल्यावर किंवा एकदम डाऊन झाल्यावर माघार घेतात. परंतु, मी करिअरच्या अतिशय उच्च स्थानावर असताना चित्रपटसृष्टीतून बाहेर पडले, तो माझ्यासाठी अभिमानाचा निर्णय होता. त्या निर्णयावर मला कधीच खंत वाटली नाही. आता मी भारतात परत आले असून, पुन्हा नृत्य आणि अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी सज्ज झाले आहे,’’ असे अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांनी सांगितले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कट्ट्यावर त्या बोलत होत्या. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सुकृत मोकाशी आदी उपस्थित होते. शेषाद्री यांनी अमेरिकेला जाण्यापासून ते आतापर्यंतचा प्रवास उलगडला.

मीनाषी शेषाद्री म्हणाल्या,‘‘मी लग्नानंतर चित्रपटसृष्टीला निरोप दिला आणि अमेरिकेत गेले. तिथे मला काय काम करायला मिळेल, याची माहिती नव्हती. नृत्य हे माझे पहिले प्रेम आहे. त्यामुळे तिकडे नृत्याची शिक्षिका झाले. मुलांना शिकविण्यात मला खूप आनंद मिळाला. माझ्या कुटुंबाला वेळ दिला. आता पुन्हा मला सेकंड इनिंग करायची आहे. त्यासाठी मी भारतात परत आले असून, आता इथेच राहणार आहे. मी नृत्य आणि अभिनय केला. परंतु, मी गायन देखील करते. त्यामुळे रसिकांसमोर गायिका म्हणून येणार आहे. हे त्यांच्यासाठी नवीन असणार आहे. लवकर माझ्या गायनाबाबतचे प्रकल्प तुमच्यासमोर येतील.’’

मराठीमध्ये काम करायला उत्सूक!

मराठीमध्ये काम करणार का ? यावर शेषाद्री म्हणाल्या, जर मराठीमध्ये चांगली फिल्म असेल आणि दिग्दर्शक उत्तम असेल तर मी नक्की काम करेन. मराठीमधील अनेक अभिनेत्री दक्षिणेत जाऊन काम करत आहेत. भाषेचा त्यामध्ये अडसर येत नाही. परंतु, मराठी भाषा मला माहिती असून, समजते. त्यामुळे मराठी चित्रपटासाठी रठ्ठामार काम करावे लागेल.’’

मी नियमित नृत्य, योग, मेडिटेशन करते. त्यामुळे माझी तब्येत अजूनही फिट आहे. आता पुढील महिन्यात मी साठीमध्ये पर्दापण करणार आहे. त्यामुळे वयाच्या साजेशा भूमिका मला मिळाल्या तर मी नक्कीच करणार आहे.

- मीनाक्षी शेषाद्री, अभिनेत्री

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे