मला नरेंद्र मोदींसारखा दुसरा पर्याय दिसत नाही, राज्याच्या विकासासाठी भाजपसोबत : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 11:59 AM2023-08-07T11:59:56+5:302023-08-07T12:02:22+5:30

काल पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी केंद्रीय सहकार संस्थेने तयार केलेल्या संकेतस्थळाचं उद्घाटन केलं.

I don't see any other option like Narendra Modi, with BJP for the development of the state says Deputy Chief Minister Ajit Pawar | मला नरेंद्र मोदींसारखा दुसरा पर्याय दिसत नाही, राज्याच्या विकासासाठी भाजपसोबत : अजित पवार

मला नरेंद्र मोदींसारखा दुसरा पर्याय दिसत नाही, राज्याच्या विकासासाठी भाजपसोबत : अजित पवार

googlenewsNext

पुणे- काल पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी केंद्रीय सहकार संस्थेने तयार केलेल्या संकेतस्थळाचं उद्घाटन केलं. या कार्क्रमात बोलताना अमित शाह यांनी अजित पवार यांचं कौतुक केलं यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही आरोप केले, यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

जयंत पाटील अन् आमचा DNA एकच, राजकीय चर्चेवर संजय राऊतांचं रोखठोक मत

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,  माझ अमित शहांनी कौतुक केलं, तुम्हाला का वाईट वाटतं. माझ्यावर कोणी टीका केली मला काही वाटत नाही. आपल्या राज्याचा विकास करण्यासाठी आपल्या अनेक समस्या सोडवण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. मला आता नरेंद्र मोदी यांच्यासारखा मजबूत नेता दिसत नाही. माणसाच्या अनुभवातून वेगवेगळी मत होऊ शकतात. रेल्वेस्थानकांच्या विकासासाठी नरेंद्र मोदी यांनी मोठा निधी दिला आहे, राज्याच्या विकासासाठी मी भाजपसोबत गेलो आहे, असंही अजित पवार म्हणाले. 

"देशात मोदींशिवाय मला दुसरा पर्याय दिसत नाही, राज्यातील महत्वाची काम आम्हाला करायची आहेत. पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ करायचं आहे. अमित शाह यांना पुणे, नाशिक रेल्वेच आम्ही सांगितलं. त्यांनी सर्व काम घेऊन दिल्लीला येण्याच निमंत्रण दिलं आहे, असंही अजित पवार म्हणाले.  
 
अजित पवार म्हणाले, साखर कारखान्यांच्या बाबतीत २०, २२ वर्ष निर्णय होत नव्हते, तो निर्णय अमित शाह यांनी घेतला आहे. अमित शाह आणि आमची चर्चा वेगळीच झाली आहे, माध्यमात येणाऱ्या चर्चा चुकीच्या आहेत. आमच्यात विकास कामा संदर्भात चर्चा झाली आहे, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं.  

Web Title: I don't see any other option like Narendra Modi, with BJP for the development of the state says Deputy Chief Minister Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.