शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
2
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
3
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
4
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
5
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
6
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
7
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
8
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
9
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
10
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
11
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
12
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
13
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
14
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
15
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
16
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
17
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
18
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
19
India vs Bangladesh 1st Test Free Live Streaming: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
20
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार

बाळ म्हणाले, मी दारू पितो! 'पप्पांनीच मला गाडी दिली'; मरण स्वस्त होत आहे, यंत्रणेने केले दोन खून

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 10:13 AM

पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे घडलेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे...

पुणे : मी कार चालविण्याचे रीतसर प्रशिक्षण घेतलेले नाही, वाहन चालविण्याचा परवानाही नाही, तरीदेखील वडिलांनीच त्यांच्या मालकीची ग्रे रंगाची पोर्श कार माझ्याकडे दिली, तसेच मित्रांसमवेत हॉटेलमध्ये पार्टी करण्यास परवानगी दिली. मी मद्यप्राशन करीत असल्याचेही वडिलांना माहिती आहे, असे अल्पवयीन आरोपीने सांगितले. चौकशीदरम्यान त्याने पोलिसांना ही माहिती दिली. पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे घडलेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. (builder vishal agrawal son killed two people in pune)

विशाल अग्रवाल यांच्याखेरीज अल्पवयीन मुलाला बार आणि पबमध्ये प्रवेश देणाऱ्या हाॅटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हाॅटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात कल्याणीनगर भागात अल्पवयीन मुलाने मद्यपान करून कार चालवून झालेल्या अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा हे तरुण-तरुणी मृत्युमुखी पडले. त्याचे संतप्त पडसाद शहरात सोमवारी दिवसभर उमटले.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले, की आरोपी मुलगा अल्पवयीनच असून, जन्माचा पुरावा मिळाला आहे. मुलाला न्यायालयाने दिलेल्या जामिनाविरोधात अपील करणार आहोत. दरम्यान, अल्पवयीन मुलाने चालविलेली कार केवळ विनाक्रमांकच नव्हती, विनारजिस्ट्रेशन असल्याचे समोर आले आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी सांगितले, की अपघातग्रस्त आलिशान कार मुंबई डीलरने रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण न करताच दिली आहे. त्यामुळे डीलरच्या ट्रेड सर्टिफिकेटवर कारवाई होऊ शकते. ती प्रक्रिया सुरू केली आहे.

अल्पवयीन मुलाला पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्याला व्हीआयपी वागणूक दिल्याचा आरोप मृतांच्या नातेवाइकांनी केला आहे. मुलाला झोपण्याची सोय आणि मुलाच्या नातेवाइकांनी पिझ्झा बर्गरही बाहेरून आणून त्याला दिल्याचे ते म्हणाले. तसेच, अपघाताबाबत अनेकांनी संवेदना व्यक्त केल्या. कँडल मार्च काढले गेले. मात्र, मृतांच्या नातेवाइकांना भेटण्याची तसदी कुठल्याही नेत्याने, नागरिकाने घेतली नाही, असा खेदही व्यक्त केला.

अश्विनी आणि अनिस यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश सर्वांचे हृदय पिळवटून टाकणारा होता. अश्विनी मूळची मध्य प्रदेशातील जबलपूर येथील आहे. अनिसचे आई-वडील वृद्ध असून, अनिस हा त्यांचा एकमेव आधार होता. अनिस आणि अश्विनी दोघांनीही कम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली होती. एका खासगी कंपनीत दोघेही कामाला होते.

न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी

अपघातानंतर अल्पवयीन मुलाला बाल न्यायालयाने काही अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला. मुलाला न्यायालयाने १५ दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्यास सांगितले. तसेच, ‘अपघात’ या विषयावर निबंध लिहिण्याची अट घातली; तसेच येरवडा वाहतूक पोलिसांसोबत वाहतूक नियमन करणार आहे. दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या करोडपतीच्या मुलाला निबंध लिहिणे, वाहतूक पोलिसांसोबत काम करणे अशा शिक्षा असतात का, असा सवाल शहरवासीयांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Drunk And Driveड्रंक अँड ड्राइव्हPuneपुणेAccidentअपघातPune Porsche Accidentपुणे पोर्श अपघात