पुणे : भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या आरोपांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर दिले असून मीच नाईक निंबाळकर यांच्या समर्थकांना कालवा समितीतून वगळले, त्यात काय प्रॉब्लेम आहे असा सवाल विचारला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आत्ता पुण्यात कालवा समितीची बैठक सुरु आहे. याबैठकीला अजित पवार यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थिती होते. या बैठकीआधी माढ्याचे खासदार असलेल्या नाईक निंबाळकर यांनी पाटील यांनी माझ्या समर्थकांना कालवा समितीतून वगळल्याचा आरोप केला होता. कालवा समितीतून एकूण चार लोकांना वगळण्यात आले,असून त्यात आमदार जयमकुमार गोरे, श्रीकांत देशमुख,विश्वास भोसले, माजी सनदी अधिकारी ,उत्तमराव जानकर यांचा समावेश आहे. नीरा डाव्या कालव्याच्या निर्णयामुळे आम्हाला वगळण्यात आलंय, जयकुमार गोरे यांचा आरोप आहे. बारामतीशी इमान राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यावर पाटील यांनी उत्तर देताना त्यामागचे कारणही स्पष्ट केले.
raते म्हणाले की, 'त्यात प्रॉब्लेम आहे? त्यांची उपयोगिता दिसली नाही, मी त्या खात्याचा मंत्री आहे, माझ्या सांगण्यावरून वगळले'. दरम्यान याच निंबाळकर यांच्या आग्रहावरून बारामती मतदारसंघात जाणारे नीरा देवघर प्रकल्पाच चाळीस टक्के पाणी माढ्यात वळवण्यात आल्याचे मानले जाते.बारामतीकरांना यांना मोठी चपराक मानली जात होती.हे पाणी परत फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर भागाला मिळणार आहे. पाणी पळवल्यावरून निंबाळकर यांनी थेट बारामतीकरांना अनेकदा लक्ष केले होते. मात्र महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर निंबाळकर समर्थकांनाच कालवा समितीतून नारळ देण्यात आला आहे.