वडकी: आई-वडील दरवर्षी पंढरीची वारी करत असत..मात्र, आठ वर्षांपूर्वी वडिलांचे अपघाती निधन झाले. खूप प्रयत्न करून सुद्धा त्यांना वाचवू शकलो नाही. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने पंढरपूरपर्यत वारीला जात येत नव्हते. पंढरीची वारी शक्य नाहीतर वारकऱ्यांच्या सेवेतून विठ्ठलाची भक्ती साधावी असा विचार करत त्यांनी पालखी मार्गावर मोफत चहा वाटण्याची सेवा सुरू केली आहे. सुरुवातीला एक हजार चहाचे वाटप केले होते. आता सातव्या वर्षी सात हजार चहा वाटप करण्यात येत आहे. निस्वार्थ सेवा केली की प्रगती नक्की होते, असे सुनील विठ्ठल गोयकर हे माऊलींचे सेवेकरी सांगत होते. वारी म्हटलं की प्रत्येकाचे तिच्याशी काही ना काही निमित्त नक्कीच जोडलेले असते. प्रपंचाच्या वाटेने अलवार वारीच्या माध्यमातून परमार्थाकडे नेणारे साधन म्हणजे वारी.. याच वारीत वडकी येथे गवसला असा एक तरुण ज्याला वारीला जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यात विठ्ठल दिसतो.. वारकऱ्यांची सेवा करावी म्हणजे वडिलांची सेवा करण्याचे भाग्य मिळेल असा भोळा भाव त्याच्या मनात आला. याच भावनेतून ते २०१३ पासून हडपसर सासवड रोडवरील वडकी या गावात ते गेल्या सहा वर्षांपासून स्वर्गीय विठ्ठल चंद्रकांत गोयकर या नावाने चहाचा स्टॉल लावत आहे. या सेवेत त्याला सापडतो विठ्ठल म्हणजे भगवंत आणि त्यांचे वडील सुध्दा.. काय आहे सुनील यांचा अनुभव जाणून घेऊ या.. सुनील म्हणाले, पहिल्या वर्षी वारीत एक हजार कप चहा वाटप केले. प्रत्येकी पाच रुपये या प्रमाणे चहाचे पैसे पाच हजार रुपये देण्याएवढीही ऐपत नव्हती. मात्र वडिलांसाठी ही सेवा करायची एवढेच डोक्यात होते. कसेबसे पैसे फेडले. त्यांनंतर प्रवास सुरु झाला तो संघर्षाचा.. वर्षभर काम करून दुसऱ्या वर्षी दोन हजार कप चहा वाटप करण्याचे ठरवले. यावेळी मात्र पैसे फेडण्या इतपत परिस्थिती नक्कीच होती. त्यांनंतर दरवर्षी एक हजारांनी चहाचे कप वाढवायचे ठेवरले. या वर्षी सात हजार कप वाटप करतोय. पैसे फेडण्याची कोणती चिंता नाही. कारण आता खूप कष्ट करून बऱ्यापैकी पैसा कमावला आहे. म्हणून त्याची विठ्ठलावर भक्ती दिवसेंदिवस वाढत आहे. पालखी सुरू झाली की, आई वडील मोठ्या उत्साहाने पालखीला जात असे. मात्र वडील गेल्यानंतर पालखीला जाण्यासाठी त्याच्या आई सोबत आता वडील जाणार नव्हते. किमान पालखी मार्गावरतरी वडिलांचा फोटो लावावा असे त्याला वाटले. वारकऱ्यांची सेवा करावी म्हणजे वडिलांची सेवा करण्याचे भाग्य मिळेल असा भोळा भाव त्याच्या मनात आला. २०१३ पासून हडपसर सासवड रोडवरील वडकी या गावात तो गेल्या सहा वर्षांपासून स्वर्गीय विठ्ठल चंद्रकांत गोयकर नावाने चहाचा स्टॉल लावत आहे.
वारीला जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यात मला विठ्ठल दिसतो..
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 12:22 PM