शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

‘आय सपोर्ट पीआय गायकवाड’, सोशल मीडियावर हॅशटॅग व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 1:27 AM

सोशल मीडियावरही पुणेकर गायकवाड यांच्या पाठीशी उभे राहत आहेत.

पुणे : भारतीय जनता पार्टीचे आमदार योगेश टिळेकर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला म्हणून कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांची बदली केल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात असताना आता सोशल मीडियावरही पुणेकर गायकवाड यांच्या पाठीशी उभे राहत आहेत. सोशल मीडियावर ‘आय सपोर्ट पीआय मिलिंद गायकवाड’ हा हॅशटॅग व्हायरल होत असून अनेक लोक गायकवाड यांचे फोटो टाकून त्यांना पाठिंबा देत आहेत.कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांची नुकताच तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या बदलीमुळे कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. हडपसरचे भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात ५० लाख रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात होता़ त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी दबावातून गायकवाड यांची बदली केल्याचा आरोप करुन विरोधी पक्षांनी त्याच्या निषेधार्थ मोर्चे काढले होते़ मनसे, हमारी अपनी पार्टी तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मोर्चे काढले़या घटनेचे मोठे पडसाद राज्यातील विविध ठिकाणी उमटले असून अनेकांनी मिलिंद गायकवाड यांच्याविषयी पोस्ट टाकून त्यांना पाठिंबा दर्शविला आहे़या बदलीमुळे शहर पोलीस दलात अस्वस्थता निर्माण झाली आहे़ मात्र, त्याचा उघडपणे निषेध करता येत नसल्याने अनेक पोलीसकर्मचारी आपल्या व्हॉट्स अ‍ॅपवर आपल्या डिपीवर मिलिंद गायकवाड यांचा फोटो लावून त्यांना समर्थन दिले आहे़सध्या फेसबुकवर ‘आय सपोर्ट पीआय मिलिंद गायकवाड’ हा हॅशटॅग वापरुन गायकवाड यांना समर्थन दर्शवण्यात येत आहे.