पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच आघाडीवर टिकाही केली आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सुद्धा राज ठाकरे आणि मनसेवर निशाणा साधला आहे. आणि नाव न घेता टीका केली आहे. काहींना मी टाइमपास पक्ष समजत होतो. त्यांना आता तरी थोडे काम मिळाले आहे असं ते म्हणाले आहेत. एका माध्यमाच्या मुलाखती दरम्यान ते बोलत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले, एमआयएम ही भाजपची बी टीम, तर मनसे ही सी टीम आहे. काहींना मी टाइमपास पक्ष समजत होतो. त्यांना आता तरी थोडे काम मिळाले आहे, अशी मनसेचे नाव न घेता अदित्य यांनी टीका केली.
महाराष्ट्रात असं राजकारण कधीही नव्हते
राज ठाकरे यांनी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात हिंदुत्व यावर भाष्य केले होते. त्याबाबत बोलताना ठाकरे म्हणाले, आमचे हिंदुत्व हे वचन पूर्ण करण्यासाठी आहे. राज ठाकरे यांना हिंदू- मुस्लीम दंगे करून यांना सरकार स्थापन करायचे आहे. महाराष्ट्रात असं राजकारण कधीच नव्हते, विरोधी पक्षाला नैराश्य आले आहे. महागाई लपविण्यासाठी राजकीय आरोप केले जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
नकला करून लोकांना हसवून महाराष्ट्रातील प्रश्न सुटणार आहेत का? अजित पवारांनी उपस्थित केला होता सवाल
राज ठाकरे नुसती पवार साहेबांवर टीका करतात, एकेकाळी पवार साहेब यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी कौतुक केलं अन आता टीका करतात. मुलाखत घेतली त्यावेळेस पवार जातीवादी वाटले नाहीत. आताच त्यांना जातीवादी वाटायला लागले. पवार साहेब आताच राजकारणात नाहीत. याचं जन्म नव्हता तेव्हा पवार साहेब राजकारण करायला लागले आणि त्यामुळे अशा लोकांनी टीका टिप्पणी करणं म्हणजे सूर्याकडे बघून थुंकण्यासारखं आहे. राज ठाकरे यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती त्याच्याकडे एक नकलाकार म्हणून पाहिल जात. नकला करून लोकांना हसवून महाराष्ट्रातील प्रश्न सुटणार आहेत का? असा सवाल ठाकरे यांनी पवार यांनी यावेळी उपस्थित केला आहे.