पुणे : पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांत झपाट्याने वाढली आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजन अथवा व्हेंटिलेटर्स मिळणे अवघड झाले आहे. त्यातच आता अनेकांना प्लाझ्मा वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे. तसेच रुग्णाच्या नातेवाईकांची मोठी धावपळ होत आहे. त्यावर मदत म्हणून मागील काही दिवसांपासून ‘हेल्प रायडर’ आणि ‘आशा प्रतिष्ठान’च्या माध्यमातून अनेक रुग्णांना मदत करण्यात येत आहे. ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, अशा एक महिना ते तीन महिन्यापर्यंतच्या कालावधी कोरोनामुक्त झालेल्यांनी प्लाझ्मादान करण्यासाठी पुढे यावे. त्यामुळे गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वांचे मोठे योगदान ठरेल, याबाबत ‘हेल्प रायडर’ आणि ‘आशा प्रतिष्ठान’च्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे ‘मी करणार प्लाझ्मादान’ अभियान आम्ही राबवत असल्याचे ‘आशा प्रतिष्ठान’चे पुरुषोत्तम डांगी यांनी सांगितले.
‘मी करणार प्लाझ्मादान’ अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 4:10 AM