पुणे : पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडूनवसंत मोरे हे लोकसभेचच्या रणधुमाळीत होते. गेल्या दीड महिन्यापासून पंतप्रधान मोदी, राहुल गांधी यांच्या बरोबरच अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या सभा पुण्यात झाल्या. ही लढत अत्यंत चुरशीची होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. अखेर १३ मेला मतदान झाले. आता पुणेकरांनी ठरवलेला खासदार बंद पेटीत आहे. येत्या ४ जूनला तो ठरणार आहे. यावेळी मतदानालाही दिलासादायक प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. त्यादरम्यान शरद पवार गटाचे अंकुश काकडे, श्रीकांत शिरोळे यांनी दरवर्षीप्रमाणे निवडणुकीपूर्वी आणि नंतर उमेदवारांच्या वाडेश्वर कट्ट्याचे आयोजन केले होते. यावेळी वसंत मोरे आणि रवींद्र धंगेकर उपस्थित होते. त्यांनी दीड महिन्यातील अनुभव इडली चटणी, शिऱ्याचा आस्वाद घेत सांगितले. त्यावेळी वसंत मोरेंनी मला ४ लाखांच्या आसपास मत मिळतील अशी शक्यता वर्तवली आहे.
मोरे म्हणाले, मी स्थानिक आणि विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढवली. शहरात शेवटच्या भागापर्यंत जाऊन मी प्रचार केला आहे. पक्षानेही मला साथ दिली आणि माझ्या पाठीशी उभा राहिला. अनेक ठिकाणी नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. माझ्याही या निवडणुकीत अनेक आठवणी आहेत. पण यावेळी मतदानाची टक्केवारी लक्षात घेतल्यावर मला ४ लाखांच्या आसपास मत मिळतील. जो कोणी उमदेवार जिंकेल तो किमान २० ते २५ हजारच्या लीडने निवडून येण्याची शक्यता आहे.
दोघे ही वेगळ्या पक्षात करत आहात, त्या पक्षातील अनुभवांबाबत वसंत मोरे यांनी सांगितले की, मी २० वर्षे मनसेत असताना राज ठाकरे साहेबांनी खूप प्रेम दिले. पण पक्षातील काहींनी कधीच प्रेम न देता फक्त पाय ओढण्याचे केले. भविष्यात प्रत्येकाचा हिशोब होणार असल्याचा हर्ष मोरे यांनी यावेळी दिला. तर आता मी वंचित बहुजन आघाडीमध्ये येऊन महिना झाला असताना मला कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी खूप प्रेम दिले असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.