मी ना डॉक्टर ना पोलीस, परवानगी मिळाली की लस घेईन: अजित पवार

By मोरेश्वर येरम | Published: January 22, 2021 02:32 PM2021-01-22T14:32:26+5:302021-01-22T14:34:31+5:30

पुण्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

i will get vaccinated if I get permission says deputy cm Ajit Pawar | मी ना डॉक्टर ना पोलीस, परवानगी मिळाली की लस घेईन: अजित पवार

मी ना डॉक्टर ना पोलीस, परवानगी मिळाली की लस घेईन: अजित पवार

Next

"पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस यांनाच कोरोनाची लस दिली जात आहे. आम्हाला ज्यावेळी लस घेण्याची परवानगी मिळेल, त्यावेळी घेऊ आणि तुम्हाला देखील सांगू", असं अजित पवार म्हणाले. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

पुण्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील कोरोना लसीकरण, धनंजय मुंडे प्रकरण आणि सीरममध्ये लागलेल्या आगीच्या मुद्द्यावर त्यांनी भाष्य केलं. 

काही लोक चुका करत असतील पण त्याची किंमत सगळ्यांनीच मोजायची का? अजित पवारांची आगपाखड

"सध्या लसीकरणाबाबत अनेक अडचणी आहेत. ग्रामीण भागात प्रमाण जास्त आहे. ६०/६५ टक्के लसीकरण झालं. मात्र शहरात २५/३० टक्के लोकांनीच लस घेतली. लोक ऐनवेळी निर्णय बदलतात. कोविन अॅपची समस्या आहे, अशी कारणं आहेत. खासगी डॉक्टर्सनाही लस द्यावी अशी मागणी आहे. त्याबाबतही निर्णय घेऊ", असं अजित पवार म्हणाले. 

तुम्ही लस घेणार का? असं अजित पवार यांना विचारण्यात आलं असता त्यांनी परवानगी मिळाली की लस घेऊ, असं उत्तर दिलं. ते म्हणाले की, "पहिल्या टप्प्यात डॉक्टर्स, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस अशा व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार आहे. आम्हाला परवानगी मिळेल, त्या दिवशी घेऊ. अजून आम्ही डॉक्टर, नर्स, पोलीस यामध्ये मोडत नाही. ज्यावेळी आदेश येतील की यांनीही लस घेतली पाहिजे, तेव्हा आम्ही लगेच लस घेऊन तुम्हाला सांगू की मी आज लस घेतली", असं अजित पवार म्हणाले. 

Read in English

Web Title: i will get vaccinated if I get permission says deputy cm Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.