Video: 'नागरिकांनी दिलेली साथ मी कधी विसरणार नाही', सुनील शेळके भावुक, तटकरेंनी पाठ थोपटली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 05:52 PM2024-08-16T17:52:48+5:302024-08-16T17:54:40+5:30
मायबाप जनता माझं सर्वस्व आहे, मला पैशांची भूक नाही, मी पैशासाठी किंवा पदासाठी राजकारणात काम करत नाही
पुणे : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून यात्रा सुरू आहे. तर अजित पवार गटाकडून जनसन्मान यात्रा सुरु आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची यात्रा मावळात दाखल झाली आहे. यावेळी मावळात सुरु असणाऱ्या सभेत सुनील शेळके (Sunil Shelake) यांना भाषण सुरु असताना अश्रू अनावर झाले. त्यावेळी सुनीत तटकरे (Sunil Tatkare) यांनी पुढे येऊन त्यांची पाठ थोपटल्याचे दिसून आले.
गेल्या निवडणुकीवेळी तुम्ही जी साथ दिली त्यासाठी कायम तुमचं काम करत राहिलं. नागरिकांनी दिलेली साथ मी कधी विसरणार नाही असं म्हणत ते भावूक झाले. यावेळी शेळके भाषण सुरु असताना एकदम थांबले. जनतेसमोर त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. यावेळी आम्ही तुमच्या सोबतच आहोत असे दर्शवत सुनीत तटकरे यांनी शेळके यांची पाठ थोपटली. जनतेतूनही लगेच घोषणांचा आवाज येऊ लागला. स्वतःला आवरून पुन्हा त्याच जोशात शेळके यांनी भाषणाला सुरुवात केली.
नागरिकांनी दिलेली साथ मी कधी विसरणार नाही'', सुनील शेळके भावुक, तटकरेंनी पाठ थोपटली#pune#sunilshelake#ajitpawar#vidhansabhaelection2024pic.twitter.com/YyQR5dNPOf
— Lokmat (@lokmat) August 16, 2024
पुढे ते म्हणाले, मला मतदान देण्यासाठी शपथा घ्यायला लावल्या तो दिवस आजही मला आठवतो. काही मंडळी आरोप, टीकाटिपणी करतात. मला आरोपांच वाईट वाटत नाही, माझा बाप कष्ट करतो, माझा भाऊ कष्ट करतो, माझी बायको सावलीसारखी उभी आहे, ज्या दिवशी सुनिल शेळके तुमचे पैसे घेईल त्या दिवशी तुमची दार बंद होतील, मी तुमच्याशी प्रामाणिक आहे, तोवर माझ्यासोबत राहा असं शेळके यावेळी म्हणाले.
विश्वासाने मी तुमची सेवा करेन
मायबाप जनता माझं सर्वस्व आहे, मला पैशांची भूक नाही, मी पैशासाठी किंवा पदासाठी राजकारणात काम करत नाही. कोणत्या मान सन्मानाची देखील मला आवश्कता नाही. परंतु ज्या मायबाप जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला. याच विश्वासाने आयुष्यभर मी तुमच्याशी प्रामाणिक राहिन, याच विश्वासाने मी तुमची सेवा करेन. उद्या निवडणुका होतील जे व्हायचं ते होऊ द्या परंतु पद प्रतिष्ठा महत्त्वाची नसते हे मला माहिती आहे, असंही पुढे शेळके म्हणाले आहेत.