Video: तोंडातून आवाज काढल्यास पोलिसांना सांगेन; अजितदादांनी विद्यार्थ्यांना भरला ‘गोड’ दम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 06:35 PM2022-06-16T18:35:11+5:302022-06-16T18:38:57+5:30

विद्यार्थी खरोखर शांत झाले हे विशेष

I will tell the police if I make a noise out of my mouth; Ajit Dad filled the students with 'sweet' breath | Video: तोंडातून आवाज काढल्यास पोलिसांना सांगेन; अजितदादांनी विद्यार्थ्यांना भरला ‘गोड’ दम

Video: तोंडातून आवाज काढल्यास पोलिसांना सांगेन; अजितदादांनी विद्यार्थ्यांना भरला ‘गोड’ दम

Next

बारामती : माझं भाषण संपल्यानंतर ‘साहेबां’च भाषण सुरु होणार आहे. जर विद्यार्थ्यांनी तोंडातून अवाज काढल्यास बाहेर काढुन टाकेन, पोलिसांना सांगेन. एकदम ‘पिनड्रॉप सायलेन्स’ राहिला पहिजे, अशा शब्दात मुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या भाषणाच्या शेवटी विद्यार्थ्यांना त्यांच्या स्टाईल ने मिश्कीलपणे वडीलधाऱ्यांचा ‘गोड’ दम दिला.

बारामती कृषि विज्ञान केंद्रावर आयोजित उदघाटनानंतर आयोजित कार्यक्रमाला परिसरातील शाळांमधून विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दरम्यान, आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या भाषणासह खासदार सुप्रिया सुळे, सारंग साठे प्रमुख वक्तव्यांचे भाषण सुरु असताना विद्यार्थ्यांचा  विद्यार्थी दशेतील गोंधळ सुरुच होता. त्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी विद्यार्थ्यांना वडीलधाऱ्यांच्या शब्दात दम भरला. त्यावर विद्यार्थी खरोखर शांत झाले हे विशेष.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, सायन्स अ‍ॅण्ड इनोव्हेशन अ‍ॅक्टीव्हीटी सेंटरच्या उदघाटनासाठी राज्यातील वेगवेगळ्या भागातील विद्यार्थी या ठीकाणी उपस्थित आहेत. कार्यक्रमात वेगवेगळी भाषण सुरु असताना विद्यार्थ्यांनी थोडी गडबड केलेली आहे,बोलणे बंद केले नाही. माझं भाषण संपल्यानंतर ‘साहेबां’च भाषण सुरु होणार आहे. जर विद्यार्थ्यांनी तोंडातून अवाज काढल्यास बाहेर काढुन टाकेन, पोलिसांना सांगेन. एकदम ‘पिनड्रॉप सायलेन्स’ राहिला पाहिजे. कार्यक्रमाला तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. अशा कार्यक्रमांचा माझ्या विद्यार्थ्यांनी चांगला फायदा घ्यावा, असे आवाहन करायला उपमुख्यमंत्री पवार विसरले नाहीत.

Web Title: I will tell the police if I make a noise out of my mouth; Ajit Dad filled the students with 'sweet' breath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.