शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

खासगी गाडीवर लाल दिवा, अधिकाऱ्याचे अँटी चेंबरही बळकावले; पुण्यातील IAS पूजाची अखेर वाशिमला बदली!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2024 11:05 AM

प्रशिक्षणार्थी असलेल्या पूजा खेडकर यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. 

किरण शिंदे 

पुणे : पूजा खेडकर.. २०२३ बॅचच्या IAS अधिकारी.. प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांची पुण्यात नियुक्ती करण्यात आली होती. मात्र नियुक्ती झाल्यापासूनच त्यांनी अधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या मागण्या करण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावले, स्वतःच्या खासगी गाडीवर लाल दिवा मिरवला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगूनही पाहिले. मात्र तरीही वर्तणुकीत बदल झाला नाही. अखेर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य अप्पर सचिवांकडे पत्र लिहीत तक्रार केली  आणि त्यानंतर प्रशिक्षणार्थी असलेल्या पूजा खेडकर यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. पूजा खेडकर यांची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. 

पूजा खेडकर ३ जून रोजी पुणे जिल्ह्यात परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्या. मात्र रुजू होण्यापूर्वीच त्यांनी जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना व्हॉट्सअपद्वारे निरोप देऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, गाडी, निवासस्थान व शिपाई याबाबत वारंवार मागणी केली. प्रत्यक्षात कोणत्याही आयएएस किंवा आयपीएस अधिकाऱ्यांना दोन वर्षाचा प्रोबेशन काळ पूर्ण करावा लागतो. त्यादरम्यान त्यांना विविध विभागात काम करावे लागते. या सर्व कामाचा अनुभव आल्यानंतरच प्रत्यक्षात त्यांची नियुक्ती केली जाते. मात्र पूजा खेडकर यांनी प्रोबेशन काळातच जिल्हाधिकाऱ्यांकडे विविध मागण्यांची जंत्रीच सुरू केली. 

इतकेच नाही तर पूजा खेडकर यांनी त्यांच्या खासगी वाहनावर अंबर दिवा लावला असून तो दिवसादेखील चालू ठेवतात. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अँटीचेंबर देखील त्यांनी बळकावल्याचे जिल्हाधिकारी यांनी सचिवांकडे लिहिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. तसेच पूजा खेडकर यांच्या वडिलांचीही वर्तणूक चुकीची असल्याचे या तक्रार अर्जात म्हटले आहे. याबाबतचे काही whatsapp चॅट देखील यांनी यासोबत जोडले आहेत. अखेर या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेल्या पूजा खेडकर यांची उचल बांगडी करण्यात आली आहे. 

पूजा खेडकर कोण आहेत? 

पूजा खेडकर या २०२३ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील त्या रहिवाशी आहेत. माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या त्या कन्या आहेत. दिलीप खेडकर हे प्रदूषण विभागाचे आयुक्त राहिलेले आहेत. तर त्यांचे आजोबा (आईचे वडील) जगन्नाथराव बुधवंत हे देखील आयएएस अधिकारी होते.

टॅग्स :Puneपुणेupscकेंद्रीय लोकसेवा आयोगCrime Newsगुन्हेगारीwashimवाशिम