नारायणगाव : शेतकऱ्यांनी दर्जेदार खते, औषधे व अनुषंगाने उपयुक्त सल्ला एकाच छताखाली उपलब्ध करून आदर्श कृषी सेवा केंद्र उभारावे, असे प्रतिपादन आत्मा पुणेचे प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे यांनी येथे केले.
कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आयोजित कृषी निविष्ठा विक्रेत्यांकरिता कृषी पदविका (देशी )अभ्यासक्रमाच्या प्रथम बॅचचे पदवी प्रदान आणि निरोप समारंभ ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर, तालुका कृषी अधिकारी सतिश शिरसाठ, मंडल कृषी अधिकारी प्रमोद बनकर, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रशांत शेटे, कृषी विषय विस्तार तज्ञ राहुल घाडगे, कृषी तंत्र निकेतनचे प्राचार्य राधाकृष्ण गायकवाड, एबीम देशी प्रशिक्षक समीर रासकर, प्रशिक्षण समन्वयक वसंत कोल्हे, एसीएबीसी प्रशिक्षण समन्वयक श्रीकांत शिंदे आदी कृषी पदविकाधारक कृषी खात व औषध विक्रेते उपस्थित होते.
साबळे यांनी कृषी निविष्ठा विक्रेते व शेतकरी यांचे नाते विश्वासाचे असून या प्रशिक्षणामुळे अधिकच वृद्धिंगत होईल असा विश्वास व्यक्त केला.
अनिल मेहेर म्हणाले , या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी मिळविलेले शास्रीय ज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांना अचूक मार्गदर्शन करावे व त्यांच्या खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने अचूक मार्गदर्शन करावे. तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल यासाठी प्रयत्नशील राहावे, असा सल्लाही यावेळी दिला.
यावेळी पदविकाधारक कृषी निविष्ठा विक्रेते सुनील ब्देरा, युवराज कोरडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले
याप्रसंगी विशेष योग्यता श्रेणीमध्ये प्रथक क्रमांकाने जगदीश वायकर, द्वितीय क्रमांकाने युवराज कोरडे, तिसऱ्या क्रमांकाने सागर पाटे आणि उत्तेजनार्थ दतात्रय हांडे, प्रदीप भुजबळ प्राविण्य मिळविले असून या प्रशिक्षणार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विषय विस्तार तज्ञ राहुल घाडगे, सूत्रसंचालन वसंत कोल्हे यांनी केले. कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रशांत शेटे यांनी आभार मानले.
१२ नारायणगाव साबळे
पदीव प्रदान समारंभात मार्गदर्शन करताना आत्मा पुणेचे प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे.