गीताबाई ज्ञानोबा मुरकुटे (वय ८२) यांचे निधन झाले. निधनानंतर त्यांची अंत्यविधीनंतरची रक्षा नदीमध्ये न सोडता नदी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ही रक्षा कुटुंबाने बाणेर टेकडीवर वसुंधरा अभियानच्या वतीने सुरू असलेल्या बाणेर टेकडी संवर्धनाच्या ठिकाणी टाकली. त्यांच्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ या ठिकाणी ५० झाडांचे वृक्षारोपण केले.
नदीच्या अस्वच्छ झालेल्या पाण्यामध्ये रक्षा सोडण्यापेक्षा ती झाडांना टाकण्यात यावी व झाडांच्या माध्यमातून स्मृतींना सातत्याने उजाळा मिळावा, अशी इच्छा गीताबाई ज्ञानोबा मुरकुटे यांनी जिवंतपणी आपल्या मुलांजवळ व्यक्त केली होती. मुलांनीदेखील आईची इच्छा पूर्ण करत झाडांच्या माध्यमातून स्मृतींना उजाळा दिला आहे. तसेच वसुंधरा अभियानच्या वृक्षसंवर्धन कार्यक्रमासाठी अकरा हजार रुपयांची देणगी दिली. जागतिक एक जल दिनाच्या पार्श्वभूमीवरती नदी संवर्धनाचा हा विचार महत्त्वपूर्ण असून वसुंधरा अभियानच्या कार्यकर्त्यांनी देखील या जाणिवेचे स्वागत केले आहे.
फोटो : गीताबाई मुरकुटे