शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

अंदाजपत्रकातील योजना विचारपूर्वकच आणल्या

By admin | Published: May 25, 2017 2:48 AM

महापालिकेचे अंदाजपत्रक तयार करताना अत्यंत विचारपूर्वक अनेक बारीक सारीक गोष्टींचा विचार केला आहे. यापूर्वीच्या सत्ताधारी पक्षांचा प्रशासनावर अंकुश, वचक नव्हता.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महापालिकेचे अंदाजपत्रक तयार करताना अत्यंत विचारपूर्वक अनेक बारीक सारीक गोष्टींचा विचार केला आहे. यापूर्वीच्या सत्ताधारी पक्षांचा प्रशासनावर अंकुश, वचक नव्हता. त्यामुळे अंदाजपत्रकांची योग्य पद्धतीने पूर्तता होत नव्हती. नावीन्यपूर्ण योजनांसह शहराच्या पायाभूत सोयी-सुविधांसाठी भरीव तरतूद असलेला सन २०१७-१८चा तब्बल ५ हजार ९१२ कोटी रुपयांचा अंदाजपत्रक सादर केला असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. मोहोळ म्हणाले की, आम्ही सुरुवातीपासूनच प्रशासनाची कार्यक्षमता कामाला लावली आहे. पुणेकरांनी टाकलेल्या विश्वासाला न्याय देत प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या करदात्यांसाठी पाच लाखांची अपघात विमा योजना, शहराचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी महापालिकेचे स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय आणि नर्सिंग कॉलेजची उभारणी, विविध भागात योगा सेंटरची स्थापना, शहराच्या पाण्याचा प्रश्न दूर करण्यासाठी कंडलिका-वरसगाव योजना, कचऱ्यापासून पुणेकरांची मुक्तता करण्यासाठी विविध उपाय-योजना, सर्वसामान्य पुणेकरांच्या मुलांना देखील दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी महापालिकेच्या सर्व शाळा ई-लर्निंग करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. उत्पन्नाच्या स्रोतांचा विचार न करता बजेट फुगवल्याची टीका विरोधकांनी केली आहे. परंतु, सन २०१७-१८ चे गेल्या अनेक वर्षांपासून मिळकतकर, पाणीपट्टीची हजारो कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी अत्यंत सूक्ष्म नियोजन सुरू केले आहे. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी याकडे कधीही गांर्भियाने लक्ष दिले नाही. यामुळे ही थकबाकी हजारो कोटींच्या घरात गेली. याच प्रमाणे शहराचा डीपी आता मंजूर झाला आहे. शहरातील बांधकामांची नियमावली तयार केली जाईल. यामुळे बांधकाम क्षेत्राला चालना मिळेल व उत्पन्नामध्ये चांगली वाढ होईल. याचबरोबर सध्या पेड एफएसआय ही नवीन संकल्पना आणत असून, यामधूनदेखील महापालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळेल. शासनाने एलबीटी बंद केल्याने महापालिकेच्या उत्पन्नामध्ये मोठी घट होईल, असे विरोधकांचे म्हणने आहे. परंतु, राज्य शासनाने जीएसटी विधेयक मंजूर करताना महापालिकांचे उत्पन्न कमी होणार नसल्याची हमी दिली आहे. याचबरोबर उत्पन्नाची इतर अनेक साधने, ज्याकडे विरोधकांनी कधी लक्षच दिले नाही. आम्ही अशा प्रकारचे उत्पन्नाचे सर्व लहान-मोठे स्रोत शोधून काढले आहेत.