शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
5
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
6
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
7
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
8
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
9
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
10
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
11
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
12
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
13
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
14
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
15
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
16
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
17
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
18
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
19
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
20
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?

‘आयडियाची कल्पना’ आणि ऑक्सिजनची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 4:10 AM

सध्या देशभरात कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याने प्राण गमवावे लागत आहेत. पुण्यातही ऑक्सिजनचा तुटवडा आहेच. शासकीय अधिकऱ्यांनी ठरविले तर ...

सध्या देशभरात कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याने प्राण गमवावे लागत आहेत. पुण्यातही ऑक्सिजनचा तुटवडा आहेच. शासकीय अधिकऱ्यांनी ठरविले तर ते कसा सकारात्मक बदल घडवू शकतात आणि आपत्कालीन परिस्थितीतून कसा मार्ग काढू शकतात याचे उदाहरण पुण्यात पाहायला मिळाले. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या जम्बो कोविड सेंटरमध्ये एक दिवस असा आला की ऑक्सिजन संपतो की काय? संपलाच तर ७०० रुग्णांचे करायचे काय? चिंतेचे ढग दाटून आले असताना एका अधिकाऱ्याची कल्पकता जागी झाली. सीसीटीव्ही मॉनिटरिंग रुममधून त्यांनी पाहिले होते अनेक रुग्णांना ऑक्सिजन मास्क काढून मोबाईलवर गप्पा मारताना, अनेकजण ऑक्सिजन न लावताही टॉयलेटला जाऊन येत होते. येथेच त्यांच्या डोक्यात चमकली ‘आयडियाची कल्पना.’

जम्बो रुग्णालयात एकूण ७०० रूग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये ऑक्सिजनयुक्त ५४०, आयसीयूच्या ६९ तर एचडीयूच्या १०० खाटा आहेत. दि.२० एप्रिल २०२१ पासून सीओईपी जम्बोमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला. मागणी २३ टनांची आणि पुरवठा १३ टनांचा अशी स्थिती निर्माण झाली होती. ऑक्सिजन बचतीबाबत तातडीने उपाययोजना राबविण्यासोबतच पुरवठा सुरळीत करण्याचे आव्हान निर्माण झाले होते.

जम्बोचे समन्वयक आणि पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांची ऑक्सिजन बचतीची कल्पना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उचलून धरली. वैद्यकीय टीमच्या मदतीने सर्व रूग्णांची ऑक्सिजन पातळी तपासण्यात आली. ज्या रुग्णांना ० ते २ लिटर ऑक्सिजनची आवश्यकता आहे, त्या रुग्णांना नेसल कॅन्यूला सिस्टीमवर घेण्यात आले. तर, २ ते ६ लिटर ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रूग्णांना सिंपल ऑक्सिजन मास्क लावण्यात आले. जे रुग्ण वैद्यकीयदृष्ट्या स्थिर आहेत आणि २४ तासांत कृत्रिम ऑक्सिजनची आवश्यकता नसल्याचे आढळून आले, अशा रुग्णांना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या होस्टेलमधील कोवीड केअर सेंटर येथे हलविण्यात आले.

उर्वरित दर दोन तीन रुग्णांच्या खाटांच्यामध्ये एक डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी नेमण्यात आला. रूग्णांबाबत, प्रत्येकी ३ ते ४ रूग्णांमागे १ वैद्यकीय अधिकारी/ कर्मचारी नियुक्त करून १५ ते २० मिनिटांसाठी त्यांचा मास्क बाजूला काढून ऑक्सिजन पातळी ९४-९५ पर्यंत स्थिर राहील याचे नियोजन करण्यात आले. या कालावधीत त्यांच्यासाठी असलेला ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आला. हा प्रयोग करताना वैद्यकीय अधिकाऱ्यांची सक्त देखरेख ठेवण्यात आली होती.

प्रत्येक रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा ''''''''मॉनिटर'''''''' करण्यात येत होता. अनेकांना अवघा ३ ते ५ लिटर/मिनिट असा ऑक्सिजन पुरवठा पुरेसा होत होता. या प्रक्रियेवर व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत होते. रात्रभर हा प्रयोग कोणत्याही रुग्णाला त्रास न होता सुरू होता. या प्रयोगामुळे एकाच रात्रीत तब्बल ८ टन ऑक्सिजन वाचला. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या ऑक्सिजनची चिंता काही प्रमाणात कमी झाली. २१ एप्रिल रोजी सुरू झालेला हा प्रयोग अद्याप सुरू आहे. यामध्ये रुग्णांनी मोठे सहकार्य केले. रुग्णांनाही प्रसाधनगृहाला जाताना, जेवताना, आवश्यकता नसताना ऑक्सिजन पुरवठा बंद करण्याची सूचना देण्यात येतात. यासाठी स्पीकरद्वारे सतत सूचना देण्यात येतात. यासोबतच गॅस पाईपलाईनची सतत तपासणी आणि गळती थांबविण्यासाठी केलेले प्रयत्न उपयोगी ठरले.

आता हाच प्रयोग विभागीय स्तरावर पश्चिम महाराष्ट्रात राबविण्याची हालचाल सुरू झाली आहे. शासनाला याबाबत सविस्तर अहवालही सादर झाला आहे. आतापर्यंत एकट्या जम्बो कोविड सेंटरमध्ये जवळपास १३० टन ऑक्सिजनची बचत झाली आहे. दिवसाला जिथे २३ टन ऑक्सिजन लागायचा तिथे १५ टनाची मागणी आहे.

----

ऑक्सिजन काळजीपूर्वक वापरण्याबद्दल रुग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, नर्सेस व वॉर्डबॉय यांना दररोज प्रशिक्षण देण्यात येते आहे. अनावश्यक वापर होत नसल्याची खात्री तंत्रज्ञांकडून करण्यात येते.

----

पालथे झोपण्याचा आणि फिजिओथेरपीचा झाला फायदा

रूग्णांना दिवसभरातून जास्तीत जास्त काळ पालथे झोपण्यास प्रवृत्त करण्यात येते. जेणेकरून त्यांच्या फुप्फुसांची क्षमता वाढते. त्यामुळे कृत्रिम ऑक्सिजनची आवश्यकता कमी भासते. ज्या रूग्णांची ऑक्सिजन पातळी ९२ ते ९५ टक्के आहे अशा रुग्णांना फिजोओथेरपी देण्यात येत आहे. जेणेकरून त्यांच्या फुप्फुसांच्या क्षमतेत वाढ होऊन कृत्रिम ऑक्सिजनची गरज कमी भासेल.

----

हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर महापालिकेच्या सर्व कोविड सेंटरमध्ये हा ''''''''फार्म्युला'''''''' वापरण्यास सुरुवात करण्यात आली. या रुग्णालयांमध्येही मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची बचत होऊ लागली आहे. त्यामुळे ऑक्सिजन तुटवड्यावर पुणे पालिका प्रशासनाने बचतीद्वारे तोडगा शोधला.

----

परिस्थिती अनुकूल नाही म्हणून हतबल होऊन बसण्यात अर्थ नसतो. शहरात ऑक्सिजनची कमतरता आहे. आहे त्याच साधनांमध्ये आणखी चांगले काम कसे करता येईल याचा विचार करून उपायुक्त मुठे यांनी कल्पकता दाखविली. त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता असतानाही ७०० रुग्णांचे जम्बो कोविड सेंटर व्यवस्थित उपचार देऊ शकले. त्यांना वरिष्ठ अधिकारी आणि वैद्यकीय टीमने साथ दिल्याने देशातील एक वेगळा प्रयोग पुण्यात यशस्वी होऊ शकला.