शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

‘आयडियाची कल्पना’ आणि ऑक्सिजनची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 4:10 AM

जम्बो रुग्णालयात एकूण ७०० रूग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये ऑक्सिजनयुक्त ५४०, आयसीयूच्या ६९ तर एचडीयूच्या १०० खाटा आहेत. ...

जम्बो रुग्णालयात एकूण ७०० रूग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये ऑक्सिजनयुक्त ५४०, आयसीयूच्या ६९ तर एचडीयूच्या १०० खाटा आहेत. दि.२० एप्रिल २०२१ पासून सीओईपी जम्बोमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला. मागणी २३ टनांची आणि पुरवठा १३ टनांचा अशी स्थिती निर्माण झाली होती. ऑक्सिजन बचतीबाबत तातडीने उपाययोजना राबविण्यासोबतच पुरवठा सुरळीत करण्याचे आव्हान निर्माण झाले होते.

जम्बोचे समन्वयक आणि पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांची ऑक्सिजन बचतीची कल्पना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उचलून धरली. वैद्यकीय टीमच्या मदतीने सर्व रूग्णांची ऑक्सिजन पातळी तपासण्यात आली. ज्या रुग्णांना ० ते २ लिटर ऑक्सिजनची आवश्यकता आहे, त्या रुग्णांना नेसल कॅन्यूला सिस्टीमवर घेण्यात आले. तर, २ ते ६ लिटर ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रूग्णांना सिंपल ऑक्सिजन मास्क लावण्यात आले. जे रुग्ण वैद्यकीयदृष्ट्या स्थिर आहेत आणि २४ तासांत कृत्रिम ऑक्सिजनची आवश्यकता नसल्याचे आढळून आले, अशा रुग्णांना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या होस्टेलमधील कोवीड केअर सेंटर येथे हलविण्यात आले.

उर्वरित दर दोन तीन रुग्णांच्या खाटांच्यामध्ये एक डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी नेमण्यात आला. रूग्णांबाबत, प्रत्येकी ३ ते ४ रूग्णांमागे १ वैद्यकीय अधिकारी/ कर्मचारी नियुक्त करून १५ ते २० मिनिटांसाठी त्यांचा मास्क बाजूला काढून ऑक्सिजन पातळी ९४-९५ पर्यंत स्थिर राहील याचे नियोजन करण्यात आले. या कालावधीत त्यांच्यासाठी असलेला ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आला. हा प्रयोग करताना वैद्यकीय अधिकाऱ्यांची सक्त देखरेख ठेवण्यात आली होती.

प्रत्येक रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा ''मॉनिटर'' करण्यात येत होता. अनेकांना अवघा ३ ते ५ लिटर/मिनिट असा ऑक्सिजन पुरवठा पुरेसा होत होता. या प्रक्रियेवर व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत होते. रात्रभर हा प्रयोग कोणत्याही रुग्णाला त्रास न होता सुरू होता. या प्रयोगामुळे एकाच रात्रीत तब्बल ८ टन ऑक्सिजन वाचला. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या ऑक्सिजनची चिंता काही प्रमाणात कमी झाली. २१ एप्रिल रोजी सुरू झालेला हा प्रयोग अद्याप सुरू आहे. यामध्ये रुग्णांनी मोठे सहकार्य केले. रुग्णांनाही प्रसाधनगृहाला जाताना, जेवताना, आवश्यकता नसताना ऑक्सिजन पुरवठा बंद करण्याची सूचना देण्यात येतात. यासाठी स्पीकरद्वारे सतत सूचना देण्यात येतात. यासोबतच गॅस पाईपलाईनची सतत तपासणी आणि गळती थांबविण्यासाठी केलेले प्रयत्न उपयोगी ठरले.

आता हाच प्रयोग विभागीय स्तरावर पश्चिम महाराष्ट्रात राबविण्याची हालचाल सुरू झाली आहे. शासनाला याबाबत सविस्तर अहवालही सादर झाला आहे. आतापर्यंत एकट्या जम्बो कोविड सेंटरमध्ये जवळपास १३० टन ऑक्सिजनची बचत झाली आहे. दिवसाला जिथे २३ टन ऑक्सिजन लागायचा तिथे १५ टनाची मागणी आहे.

----

ऑक्सिजन काळजीपूर्वक वापरण्याबद्दल रुग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, नर्सेस व वॉर्डबॉय यांना दररोज प्रशिक्षण देण्यात येते आहे. अनावश्यक वापर होत नसल्याची खात्री तंत्रज्ञांकडून करण्यात येते.

----

पालथे झोपण्याचा आणि फिजिओथेरपीचा झाला फायदा

रूग्णांना दिवसभरातून जास्तीत जास्त काळ पालथे झोपण्यास प्रवृत्त करण्यात येते. जेणेकरून त्यांच्या फुप्फुसांची क्षमता वाढते. त्यामुळे कृत्रिम ऑक्सिजनची आवश्यकता कमी भासते. ज्या रूग्णांची ऑक्सिजन पातळी ९२ ते ९५ टक्के आहे अशा रुग्णांना फिजोओथेरपी देण्यात येत आहे. जेणेकरून त्यांच्या फुप्फुसांच्या क्षमतेत वाढ होऊन कृत्रिम ऑक्सिजनची गरज कमी भासेल.

----

हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर महापालिकेच्या सर्व कोविड सेंटरमध्ये हा ''फार्म्युला'' वापरण्यास सुरुवात करण्यात आली. या रुग्णालयांमध्येही मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची बचत होऊ लागली आहे. त्यामुळे ऑक्सिजन तुटवड्यावर पुणे पालिका प्रशासनाने बचतीद्वारे तोडगा शोधला.

----

परिस्थिती अनुकूल नाही म्हणून हतबल होऊन बसण्यात अर्थ नसतो. शहरात ऑक्सिजनची कमतरता आहे. आहे त्याच साधनांमध्ये आणखी चांगले काम कसे करता येईल याचा विचार करून उपायुक्त मुठे यांनी कल्पकता दाखविली. त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता असतानाही ७०० रुग्णांचे जम्बो कोविड सेंटर व्यवस्थित उपचार देऊ शकले. त्यांना वरिष्ठ अधिकारी आणि वैद्यकीय टीमने साथ दिल्याने देशातील एक वेगळा प्रयोग पुण्यात यशस्वी होऊ शकला.