शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

डीएनएद्वारे पटणार जवानांची ओळख; ७ हजार जवानांच्या नमुण्यांचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 3:52 PM

‘हाय रिस्क झोन’ मधील जवनांचे डीएनए प्रोफायलिंग करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती आर्म फोर्स मेडिकल सर्व्हिसेचचे डायरेक्टर जनरल लेफ्टनंट जनरल बिपिन पुरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

ठळक मुद्देआर्म फोर्स मेडिकल महाविद्यालयात अ‍ॅन्यूअल आर्म फोर्स मेडिकल कॉन्फरन्सचे आयोजनलष्करी आरोग्याविषयात अतिउच्च दर्जाच्या संशोधनात वाढ करण्याविषयी तज्ज्ञांची होणार बैठक

पुणे : एनएसजी जवान तसेच स्पेशल फोर्स कमांडो, वैमानिक तसेच पाणबुडी आणि जहाजावरील सैनिक यांना कायम अपघातात धोका असतो. बॉम्ब हल्ला, आग तसेच विमान अपघातात सैनिकांच्या मृतदेहांची ओळख पटविणे कठीण होते. यासाठी ‘हाय रिस्क झोन’ मधील जवनांचे डीएनए प्रोफायलिंग करण्याचे काम सुरू आहे. जवळपास ७ हजार जवानांचे डीएनए सँम्पलिंग जमा करण्यात आले आहे. भविष्यातही सँपलिंगचे काम सुरू राहणार असून संपूर्ण जवानांचे डीएनए जमा करण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे जवानांची ओखळ पटवणे भविष्यात शक्य होणार आहे, अशी माहिती आर्म फोर्स मेडिकल सर्व्हिसेचचे डायरेक्टर जनरल लेफ्टनंट जनरल बिपिन पुरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुण्यातील आर्म फोर्स मेडिकल महाविद्यालयात ६६ व्या अ‍ॅन्यूअल आर्म फोर्स मेडिकल कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी लष्करी आरोग्याविषयात अतिउच्च दर्जाच्या संशोधनात वाढ करण्याविषयी तज्ज्ञांची बैठक होणार आहे.  याबाबत पत्रकारांना माहिती देताना लेफ्टनंट जनरल बिपिन पुरी बोलत होते. पुरी म्हणाले, की नमुने गोळा करण्यासाठी १७० डॉक्टरांची टीम प्रशिक्षीत करण्यात आली आहे. पुण्यातील एएफएमसीमध्ये ते गोळा करण्याचे काम सुरू आहे. गेल्या वर्षी झालेल्या सुखोईच्या अपघातात वैमानिकांची ओखळ पटवणे कठीण झाले होते. यावेळी त्यांच्या शरीराच्या काही अवयावरून डीएनएच्या माध्यमातून त्यांची ओळख पटविण्यात आली होती. यामुळे संपूर्ण जवानांचे डीएनए नमुने घेण्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. आर्म फोर्स मेडिकल कॉलेजद्वारे ते करण्यात येत आहे. आर्म फोर्स मेडिकल महाविद्यालयाच्या कोर्सची क्षमता वाढवण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. ही मागणी सरकारने मान्य केली असून येत्या सत्रापासून १५० मुला मुलींना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. याबरोबरच त्यांना पायाभूत सुविधाही देण्यावर भर असणार आहे. यात मानव संसाधन, वसतीगृहे, शिक्षक तसेच दळणवळणाच्या सोयी आणि सुविधाही वाढवण्यात येणार आहे. यामुळे त्यांना उतिउच्च दर्जाचे शिक्षण देता येणार आहे. जवानांना अनेक आघाड्यांवर लढावे लागते. अति उंचावरील थंड प्रदेशात तसेच वाळवंट, समुद्र आणि हवेत प्रतिकुल परिस्थितीत त्यांना शत्रुचा सामना करावा लागतो. या स्थितीत त्यांची क्षमता वाढवणे गरजेचे आहे. यासाठी  मिलीटरी मेडिसीन संशोधन करणे गरजेचे आहे. यासाठी आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये येत्या काळात  रिसर्च विंगची स्थापना करण्यात येणार आहे. यात लष्कराच्या मेडिकल कॉलेजमधून संशोधकांची फळी निर्माण करण्यात येणार आहे. ही टीम जवानांच्या क्षमता वाढीसाठी संशोधन करणार आहे. गेल्या वर्षी एफमसीला जार्इंट पार्लामेंट्री हेल्थ कमिटीने भेट दिली होती. त्यांनी एएफएमसी ही स्वायत्त करण्याबाबत तसेच ही संस्था इन्स्टिट्यूट आॅफ नॅशनल इंपॉरटन्स करण्याबाबत सूचना केल्या होत्या. या बाबतचा प्रस्ताव  पाठवण्यात आला असून भविष्यात याबाबत निर्माण होईल. 

आसीयान देशांबरोबर होणार लष्करी प्रात्यक्षिकेआसीयान देशांसोबत मिलीटरी मेडिसीन बाबत सहकार्य करण्यासाठी भारत प्रयत्न शिल आहे. बाबत म्यॉनमार देशाला सहकार्य करण्यात येणार आहे. या बाबत मार्च २०१९ मध्ये लखनौ येथे सर्वात मोठे फिल्ड एक्सरसाईचे आयोजन करण्यात आले आहे. यात सर्व आसीयान देश सहभागी होणार आहे. यात आपत्ती व्यवस्थापन तसेच इतर लष्करी कवायती होणार आहे. 

पुण्यात होणार रोबोटद्वारे सर्जरीशस्त्रक्रियेच्या प्रक्रियेत अनेक बदल होत आहे. रोबोटच्या माध्यमातून शस्त्रक्रीया करण्यात येत आहे. येत्या काळात पुण्यातील एएफएमसी, तसेच मुंबई आणि बंगळुरू येथील लष्कराच्या रूग्णालयात रोबोटद्वारे शस्त्रक्रीया करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारे उपकरणे तसेच विभागाची निर्मिती करण्यात येणार आहे.

युद्धभूमीतून जखमींना रोबोट काढणार बाहेरयुद्धभूमीत जखमी जवानांना सुरक्षित बाहेर काढणे मोठी जबाबदारी असते. जवानांना आपला जीव धोक्यात घालून जखमींना बाहेर काढावे लागते. भविष्यात जखमींना युद्धभूमितून बाहेर काढण्यासाठी रोबोटची मदत घेण्यात येणार आहे. त्या दृष्टीने डीआरडीओमध्ये असे रोबोट बनविण्याचे संशोधन सुरू असल्याची माहिती लेफ्टनंट जलरल पुरी यांनी दिली. 

अवयव प्रत्यारोपणाबाबत जनजागृतीएएफएमसीमध्ये सर्व प्रकारच्या अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रीया होत आहे. यासाठी अवयव प्रत्यारोपण कार्यक्रम हाती घेतला आहे. लष्करातील जवान तसेच सामान्य नागरिकांनी अवयव दानासाठी अर्ज केले आहे. लष्कराच्या सर्व ठिकाणी अवयव प्रत्यारोपणासाठी यंत्रणा तयार करण्यात आली आहे. कमी वेळेत अवयव रूग्णाला देण्यासाठी विशेष विमान आहे. मात्र, अवयव दानाबाबत जागृती झालेली नाही. बरेचदा डोनर मिळत नसल्याने रूग्णांचा जीव वाचत नाही. अवयावासाठी प्रतिक्षेत असणा-यांची संख्या मोठी आहे.  यासाठी नॅशनल आॅरगन ट्रान्सप्लांट आॅरगनायझेशनची समन्वय साधण्यात येत आहे. याबरोबर आर्म फोर्स आॅरगन ट्रान्सप्लांट प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे. याद्वारे गरजु जवांनांचे अवयव प्रत्यारोपण केले जात आहे. 

कमांड हॉस्पिटलचे रखडलेले काम लवकर होणार पूर्णपुण्यातील सर्वात मोठे असणारे कमांड हॉस्पीटलचे रखडलेले काम लवकरच पूर्ण होणार आहे. १०८२ बेडची सुविधा असलेल्या या दवाखाण्याच्या कामाला २०१३ मध्ये मंजुरी मिळाली होती. हे काम २०१६ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. दवाखान्याच्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, आतील काही कामे कंत्राटदाराने पूर्ण केली नाहीत. कामाला उशीर होत असल्यामुळे सध्या असलेल्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. फेब्रुवारी महिन्यात नव्याने निविदा काढण्यात येणार असून राहिलेले काम मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड