महेश जगताप
सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील वाघळवाडी हे गाव नेहमीच चर्चेत राहिले आहे. गेल्या वर्षी सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत संचालकपदाला डावलण्यात आल्याने केळीचे चित्र असलेले बॅनर लावण्यात आले होते. याची चर्चा जिल्हाभर झाली होती. बारामती तालुक्यातील वाघळवाडीसह १३ ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीसाठी सरपंचपदासाठी १३ तर सदस्यपदासाठी ६१ जणांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दि ५ रोजी झालेल्या अर्ज छाननी मध्ये एका सदस्यपदाच्या उमेदवाराचा अर्ज अवैद्य ठरला असून ६० उमेदवार सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक रिंगणात उभे आहेत. आज अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत आहे. यामध्ये किती उमेदवार माघार घेतात ते समजणार आहे.
वाघळवाडी येथील सुरेश किसनराव यादव यांनी या निवडणुकीत आपल्या घरावर एक बॅनर लावला असून तो बॅनर तालुक्याचे लक्ष वेधून घेत आहे. समाजकंटक, भ्रष्टाचारी व भ्रष्टाचारीला अभय देणाऱ्या उमेदवार यांनी मत मागायला आल्यास अपमान केला जाईल अशा आशयाचे बॅनर लावले आहे. यादव यांच्या घरात पाच मते आहेत. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच बारामती तालुक्यात देखील ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. यात बारामती तालुक्यातील वाघळवाडी हे गाव राजकीय दृष्ट्या नेहमी चर्चेत असते. ते आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. वाघळवाडीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा बॅनर लागले आहे. त्याची राज्यभर चर्चा होऊ लागली आहे. या गावातील एका नागरिकाने आपल्या घराबाहेर बॅनर लावले आहे. त्याची चर्चा आता रंगू लागली आहे.वाघळवाडी येथील सुरेश यादव यांनी हा बॅनर लावला आहे. यावर समाजकंटक, भ्रष्टाचारी, भ्रष्टाचाराला अभय देण्याकरिता मत मागणी करता येणाऱ्या उमेदवाराचा अपमान करण्यात येईल, या आशयाचा बॅनर लावण्यात आला आहे. त्याची आता राज्यभर चर्चा रंगू लागली आहे.