"कार्यक्रमाला अजित पवार आले तर तीव्र आंदोलन..." बारामतीत मराठा क्रांती मोर्चाचा आक्रमक पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 02:02 PM2023-10-25T14:02:30+5:302023-10-25T14:03:22+5:30

याबाबत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप यांना निवेदन देण्यात आले आहे...

"If Ajit Pawar comes, we will protest strongly..." Maratha Kranti Morcha aggressive in Baramati | "कार्यक्रमाला अजित पवार आले तर तीव्र आंदोलन..." बारामतीत मराठा क्रांती मोर्चाचा आक्रमक पवित्रा

"कार्यक्रमाला अजित पवार आले तर तीव्र आंदोलन..." बारामतीत मराठा क्रांती मोर्चाचा आक्रमक पवित्रा

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ६७ व्या गळीत हंगाम शुभारंभाच्या जंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मात्र, शनिवारी (दि. २७) होणाऱ्या या कार्यक्रमावर मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाचे सावट निर्माण झाले आहे.

याबाबत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप यांना निवेदन देण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चाने मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय व्यक्तींना महाराष्ट्रात गाव बंदी केलेली आहे. तशी प्रसिध्दी राज्यभर दिलेली आहे. त्यानंतर देखील कारखान्याचा गळीत हंगाम उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते करण्याचे नियोजन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.

आरक्षण मिळेपर्यंत गावबंदी-

मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्वच राजकीय व्यक्तींना गावबंदी आहे. त्यामुळे या वर्षीचा गळीत हंगाम कोणत्याही राजकीय व्यक्तींच्या हस्ते करू नये, अशी विनंती अध्यक्ष जगताप यांना करण्यात आली आहे. राजकीय व्यक्तींच्या हस्ते गळीत हंगाम सुरू करण्याचा घाट घातल्यास कारखान्यावर बहुसंख्येने येऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमच्यावर राहिल, असा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

Web Title: "If Ajit Pawar comes, we will protest strongly..." Maratha Kranti Morcha aggressive in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.