शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

रुग्णवाहिकांना वाट दिल्यास वाचेल जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 1:58 AM

एका ज्येष्ठाच्या छातीत खूप वेदना होत होत्या... कुटुंबीयांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावली... रुग्णाची स्थिती खूपच गंभीर होती... त्यांना बावधनहून कोथरूडमधील एका रुग्णालयात आणले.

पुणे : एका ज्येष्ठाच्या छातीत खूप वेदना होत होत्या... कुटुंबीयांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावली... रुग्णाची स्थिती खूपच गंभीर होती... त्यांना बावधनहून कोथरूडमधील एका रुग्णालयात आणले. उपचार सुरू झाले अन् रुग्णाचा जीव वाचला... पण त्या वेळी डॉक्टरांचे एक वाक्य सर्वांनाच हुरहुर लावून गेले... ‘थोडा उशीर झाला असता, तर ते वाचले नसते.’ रुग्णवाहिकेच्या चालकाने सांगितलेला हा अनुभव... त्या दिवशी वाहतूककोंडीत रुग्णवाहिका अडकली असती तर... प्रत्येक वेळी वाट मोकळी असेलच, असे नाही... शहर व परिसरात अनेकदा वाहतूककोंडीत रुग्णवाहिका अडकल्याचे पाहायला मिळते. रुग्णांच्या नातेवाइकांप्रमाणेच आम्हालाही वाहतूककोंडीची धास्ती असल्याचे रुग्णवाहिकाचालकांनी सांगितले.‘रुग्णवाहिकांसाठी वाट मोकळी करून द्या’ असे आवाहन विविध यंत्रणांकडून सातत्याने केले जाते. पण तब्बल ३० लाखांहून अधिक वाहने असलेल्या शहरामध्ये रुग्णवाहिकांसाठी ही वाट तितकीशी सोपी नाही. ‘लोकमत’ने गुरूवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून रुग्णवाहिकांसाठी ही वाट किती बिकट असते, हे समोर आणले. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही रुग्णावाहिकांकडे अनेक वाहनचालकांकडून दुर्लक्ष केले जाते. सायरन वाजवत येणाºया रुग्णवाहिकांना वाट देण्यातही कुचराई केली जाते. त्यामुळे चालकांना अनेकदा हॉर्न वाजविण्याची वेळ येते. रस्त्यावरील सिग्नल बंद असो वा सुरू, चालकांना हा अनुभव नेहमीच येतो. प्रामुख्याने सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत रस्ते ओसंडून वाहत असतात. या काळात रुग्णवाहिका चालकांचा वाट काढताना कस लागतो.वाहतूककोंडीतून वाट काढताना कराव्या लागणाºया कसरतीविषयी शहराच्या वेगवेगळ्या भागात असलेल्या रुग्णवाहिका चालकांशी संवाद साधला असता बहुतेकांनी बेशिस्त वाहनचालकांना दोष दिला. रस्त्यावर रुग्णवाहिका दिसल्यानंतर तिथे पोलीस असल्यास ते वाट मोकळी करण्यासाठी मदत करतात. मात्र, अनेकदा मोठ्या चौकांमध्ये पोलीस नसतील तर काही वाहनचालक साधे सामाजिक भानही ठेवत नाही.रुग्णवाहिका दिसत असूनही वाट दिली जात नाही. काही वाहनचालक स्वत:हून पुढाकार घेत गर्दीत अडकलेल्या रुग्णवाहिकेला मदत करतात. पण हा चांगुलपणा, सामाजिक जाणीव खूप कमी वेळा पाहायला मिळते. वाहनचालक, नागरिकांची मानसिकता बदलल्याशिवाय हे चित्र बदलणार नाही, असे रुग्णवाहिका चालकांनी सांगितले.रस्त्यावरून रुग्णवाहिका जात असताना वाट मोकळी करून देणे अपेक्षित असते. पण अनेक वाहनचालकांना त्याचे भान नसते. वाट देण्याच्या नादात वाहनांचा वेग वाढवला जातो. उजव्या, डाव्या बाजूला वाहने घेणे आवश्यक आहे. त्यासाठी मानसिकतेत बदल व्हायला हवा. वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. त्याचाही फटका रुग्णवाहिकांना बसतो.- गोपाळ जांभे, सचिव,पुणे जिल्हा अ‍ॅम्ब्युलन्स असोसिएशनमी गेली ७ वर्षे रूग्णवाहिका चालक म्हणून पिंपरी-चिंचवड येथे कार्य करत आहे. पुर्वीची आणि आताची परिस्थिती बघता रूग्णवाहिकांना योग्य तो प्रतिसाद मिळत नाही. नागरिकांकडून पाहिजे तशी मदत न मिळाल्याने रूग्णवाहिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. सायरन चा आवाज येत असून देखील नागरिक बाजूला होणार नाही. आहे तिथेच उभे राहणार. आणि काही नागरिक असेही आहेत की, जे रूग्णवाहिकेला जाण्यासाठी जागा देतील. लोकांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. - मनोज दाभाडे, चालकमी हडपसर येथील परिसरामध्ये रूग्णवाहिका सेवा पुरवण्याचे काम करतो. साधारणत: सकाळी ३ तास आणि सायंकाळी ३ तास जास्त प्रमाणात गाड्यांची रहदारी असल्याने रूग्णवाहिकेला जाण्यासाठी खूप जास्त प्रमाणामध्ये अडथळा निर्माण होतो. अशा वेळी एखाद्या ठिकाणी अपघात झाला तर आम्हाला त्या ठिकाणापर्यंत पोहचण्यासाठी वेळ लागतो. आम्हाला रिक्षा चालकांकडून प्रतिसाद मिळत नाही. तसेच एखाद्यावेळी बीआरटी बस जर बंद पडलेली असेल तर मार्गावर खूप अडचणी येतात.- माधव तेकवडे, चालक ईश्वर रूग्णवाहिका