शिवानी खोरगडे
पुणे : भाजपा महाराष्ट्रात विरोधी पक्षात असतानाही राज्यसभा आणि विधान परिषद अशा दोनही निवडणुकांमध्ये त्यांचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले. भाजपाच्या या विजयानंतर शिवसेनेचे खंदे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे काही आमदारांसोबत नॉट रिचेबल झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नाराज आमदार गुजरातच्या सूरतमध्ये असून ते नाराज असल्याचं आता उघड झालं आहे
शिवसेनेमध्ये नाराजीचा स्फोट झाल्याचे दिसत आहे. सेनेचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे हे सुमारे तीस आमदारांना घेऊन गुजरातमध्ये तळ ठोकून असल्याचे वृत्त आहे. यावर अभिनेता अभिजित बिचुकले यांनी आपल मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, आज जे एकनाथ शिंदे यांनी जे नाराजी नाट्य केलं आहे जर बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या कानाखाली जाळ काढला असता. अस यावेळी बिचुकले म्हणाले.आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा होणार असून या सोहळ्याच्या निमित्ताने बिचुकले हे आळंदीत आले होते. यावेळी ते बोलत होते.
बिचुकले म्हणाले, राज्यात चाललेली राजकीय पार्श्वभूमी सर्वसामान्यांच्या हिताची नाही. आता महाराष्ट्रात सर्व सामान्यांचे अनेक प्रश्न आहेत. त्यामध्ये शिवसेनेचे राजकारण सुरु आहे. आज जे एकनाथ शिंदे यांनी जे नाराजी नाट्य केलं आहे जर बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या कानाखाली जाळ काढला असता असे मत बिचुकले यांनी व्यक्त केले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहावेत हीच सदिच्छा सरकार पडेल कि नाही असे बिचुकलेला विचारले असता ते म्हणाले, आज सकाळपासून टीव्हीवर एकनाथ शिंदेंबद्दल दाखवले जात आहे. काही आमदार शिंदे तर काही ठाकरेंच्या पाठीशी आहेत. मला आतलं काही माहित नाही, सरकार पडेल का ते मी सांगू शकत नाही. पण उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री राहावे हीच सदिच्छा आहे.