शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

बारामती-फलटण रस्ता न झाल्यास डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा होणार रद्द

By admin | Published: May 21, 2017 3:52 AM

बारामती-फलटण रस्ता जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत भारतात न येण्याचा निर्धार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे.

- लोकमत न्यूज नेटवर्क

सांगवी : बारामती-फलटण रस्ता जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत भारतात न येण्याचा निर्धार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे.यामुळे हा रस्ता शासनाने दुरुस्त करावा असा उपहासात्मक संदेश सध्या या रस्त्याच्या दुरवस्थेचे वास्तव सोशल मीडियावरून गाजत आहे. सोशल मीडियाच्या खिल्लीमुळे गेल्या सात वर्षांपासून रस्त्याच्या रखडलेल्या कामावर स्थानिकांनी बोट ठेवले असले तरी प्रशासकीय उदासीनता यामुळे पुन्हा आणखी पुढे आली आहे.वरकरणी जरी हा विनोद वाटत असला तरी मागील सात वर्षांपासून या रस्त्याच्या कामाबाबत शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात उदासीनता दिसून येत आहे. वारंवार बारामती-फलटण रस्त्याच्या रखडलेल्या कामाबाबत वृत्त प्रसिद्ध झाले आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येत नसल्याचे चित्र आहे. सांगवी-बारामती रस्त्याची मोठ्या प्रमाणात चाळण झाली आहे. रस्त्यावर अनेक मोठमोठे खड्डे पडले आहेत. दर महिन्याला या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. रस्त्यावर पडलेले खड्डे खडी व डांबर टाकून बुजविण्यात येतात. मात्र, पुढील पंधरा दिवसांमध्ये रस्त्याची अवस्था पुन्हा जैसे थे होते. त्यामुळे दर महिन्याला लाखो रुपये खड्ड्यात जात आहेत. बारामती-फलटण हा राज्य महामार्ग असल्याने पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक या रस्त्याने होत असते. वाहनांची वर्दळ जास्त असल्याने रस्त्यावरील खड्ड्यांची संख्याही वाढत आहे. ५ ते ६ फुटांहून अधिक मोठ-मोठे खड्डे या रस्त्यावर पडले आहेत. सांगवी, अठरा फाटा (शिरवली), काळा ओढा, बावीस फाटा, पाहुणेवाडी, गवारफाटा आदी भागात मोठ्या प्रमाणावर ड्डे आहेत. वारंवार मागणी करूनदेखील या रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळत नाही. रखडलेल्या कामामुळे अपघातांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दररोज या रस्त्यावर किरकोळ अपघात ठरलेलेच असतात. या रस्त्याने दररोज प्रवास करणारे नागरिक, प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार जीव मुठीत घेऊनच प्रवास करतात. खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. प्रशासनाला अद्याप जाग नाहीबारामती-फलटण रस्त्याच्या कमासाठी राजकीय पक्षांनी वारंवार आंदोलने केली. अनेक संस्था संघटनांनीही हा प्रश्न आंदोलनाच्या माध्यमातून समोर मांडला. मात्र गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला अद्याप जाग येत नाही. त्यामुळे वैतागलेल्या नागरिक व प्रवाशांनी आता सोशल मीडियातून या प्रश्नाला वाचा फोडली आहे. या रस्त्यावर सांगवी या ठिकाणी नीरा नदीवर मोठा पूल आहे. हा पूल सातारा-पुणे जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा पूल म्हणून ओळखला जातो. या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. तसेच पुलाचे संरक्षक कठडे तुटले आहेत. शिरवलीच्या बंधाऱ्याच्या पाण्याचा फुगवटा या पुलापर्यंत येतो. तसेच या ठिकाणी नदीपात्र रुंद आहे. परिणामी वाहतुकीसाठी हा पूल धोकादायक आहे.