लोकांच्या हिताचा निर्णय असेल तर...; शहरातील अमेनिटी स्पेसबाबत अजित पवारांचं सूचक वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 09:37 PM2021-08-27T21:37:49+5:302021-08-27T21:39:06+5:30
पुणे शहरातील अमेनिटी स्पेस बाबत सध्या सुरू असलेल्या चर्चा आणि वादाबाबत रविवारी निर्णय घेणार
पुणे : एखादा निर्णय लोकांच्या हिताचा असेल, शहराचा फायद्याचा आणि पारदर्शक असेल तर माझा नेहमीच पाठिंबाच असतो, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महापालिकेने घेतलेल्या अमेनिटी स्पेसबाबत सूचक वक्तव्य केले. दरम्यान या संदर्भात रवावारी बैठक घेणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
शहरातील अमेनिटी स्पेस बाबत सध्या सुरू असलेल्या चर्चा आणि वादाबाबत रविवारी निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी विधान भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. शहरातील नागरी सुविधांची भूखंड तीस वर्षाच्या भाडेतत्त्वावर देऊन त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून शहराचा विकास करावयाचा या पुणे महानगरपालिकेतील भाजपच्या प्रस्तावाबाबत सध्या सर्व स्तरावर चर्चा सुरू आहे. या प्रस्तावाबाबत बुधवारी पुणे महानगर पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस काही मुद्द्यांचा स्वीकार करत सशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला होता, मात्र याबाबत बुधवारी रात्री पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन या निर्णयापासून घूमजाव करण्यात आले होते. आज पत्रकार परिषदेत पत्रकारांनी अजित पवार यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की शहराच्या विकासाच्या दृष्टीने विचार करून निर्णय घेण्याचा माझा काय मानस असतो विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारण कधीच केले जात नाही.
पुणे महानगरपालिकेच्या अमेनिटी स्पेस बाबत मी रविवारी सकाळी 11 ते 1 या वेळेत पक्षातील नगरसेवक. शहराध्यक्ष प्रशांत जगताप.खासदार वंदना चव्हाण यांच्याशी चर्चा करणार आहे. या बैठकीच्या पूर्वी पुणे महानगर नियोजन समितीने तयार केलेल्या विकास आराखड्याचे प्रात्यक्षिक अधिकारी वर्गाकडून दाखविणत येणार आहे.अमेनिटी बाबत निर्णय घेताना नागरिकांचे हित बघितले जाईल नगरसेवकांचे पाहिले जाणार नाही. नागरिकांचाही तसाच विचार करीत आलो आहे