शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
4
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
5
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
6
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
7
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
8
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
9
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

‘दशक्रिया’ प्रदर्शित न झाल्यास राष्ट्रीय पुरस्काराचा अवमान; संदीप पाटील चित्रपट प्रदर्शनावर ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 4:09 PM

‘दशक्रिया’ चित्रपट न पाहताच त्यावर टीकेची राळ ओढणार्‍या अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाला चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांनी एक पाऊल मागे घेत मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रिमिअरला निमंत्रण दिले आहे.

ठळक मुद्देचित्रपटाचे आॅनलाईन बुकिंग रद्द केले असल्याचा ब्राम्हण महासंघाचा दावामहासंघाने बाबा भांड यांनी लिहिलेली ही कादंबरी देखील वाचलेली नाही, ही दुर्दैवी गोष्ट : संदीप पाटील

पुणे : ‘दशक्रिया’ चित्रपट न पाहताच त्यावर टीकेची राळ ओढणार्‍या अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाला चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांनी एक पाऊल मागे घेत मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रिमिअरला निमंत्रण दिले आहे. मात्र महासंघाने नकार दर्शवित पुण्यातील सर्व चित्रपटगृहांच्या मालकांना उद्या (शुक्रवारी) हा चित्रपट प्रदर्शित न करण्यासंबंधी निवेदन देत आडमुठेपणाची भूमिका कायम ठेवली आहे. पुणे, मुंबई आणि गोव्यामधील महोत्सवामध्ये या चित्रपटाचे पूर्वीच दोन शो झाले आहेत तेव्हा ब्राम्हण महासंघ झोपला होता का? तेव्हा का नाही चित्रपटाला विरोध दर्शविला? असा सवालही दिग्दर्शकाने उपस्थित केला आहे. हा चित्रपट प्रदर्शित केला नाही तर राट्रीय पुरस्काराचा अवमान ठरू शकतो याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. ‘दशक्रिया’  चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ‘ब्राम्हण लोक स्वत: चे पोट भरण्यासाठी दशक्रिया विधी करतात’ अशी खोचक टिप्पणी करीत ब्राम्हणांसह हिंदू धर्मालाच टीकेचे लक्ष्य करण्यात आले आहे. हा चित्रपट जातीद्वेष पसरविणारा असून, सेन्सॉर बोर्डाने त्याला परवानगी देऊ नये अशी मागणी करीत गुरूवारी सिटीप्राईडसह ई-स्क्वेअर, आयनॉक्स, प्रभात, विजय अशा पुण्यातील चित्रपटगृहाच्या मालकांना हा चित्रपट प्रदर्शित करू नये यासंबंधी महासंघाने निवेदन दिले आहे. त्याला चित्रपटगृहाच्या मालकांनी प्रतिसाद दिला असून, सिटीप्राईडच्या मालकांनी दूरध्वनी करून या चित्रपटाचे आॅनलाईन बुकिंग रद्द केले असल्याचा दावा महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केला आहे. दशक्रिया चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी मुंबईला चित्रपटाचा प्रिमिअर पाहाण्यासाठी दूरध्वनीद्वारे निमंत्रण दिले मात्र आमचे मुख्य कार्यालय पुणे आहे तुम्ही पुण्यात येऊन चित्रपट दाखवावा. आम्ही येणार नाही असे त्यांना सांगण्यात आल्याचे दवे म्हणाले. मात्र महासंघाच्या या आडमुठेपणाच्या भूमिकेवरच दशक्रिया चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप पाटील यांनी टीका केली आहे. आमची उद्या (शुक्रवारी) चित्रपट प्रदर्शन करण्याची धावपळ आहे. तरीही एक पाऊल मागे घेत चित्रपटाच्या प्रिमिअरला येण्यासाठी महासंघाच्या पदाधिकार्‍यांना निमंत्रण दिले मात्र त्यांनी पुण्यात शो आयोजित करण्यास सांगितले जे तूर्तास शक्य नाही. कोणत्याही कलाकारासाठी कलाकृती महत्त्वाची आहे. चित्रपट बघावा आणि मग चर्चा घडावी. या चित्रपटाला सेन्सॉरची परवानगी मिळाली आहे. या चित्रपटावर राष्ट्रीय पुरस्काराची मोहोर उमटली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊ न देणे म्हणजे राष्ट्रीय पुरस्काराचा अवमान ठरेल. महासंघाने बाबा भांड यांनी लिहिलेली ही कादंबरी देखील वाचलेली नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे. कितीही विरोध असला तरी आम्ही चित्रपट प्रदर्शित करणारच असा विश्वास संदीप पाटील यांनी व्यक्त केला.

चित्रपटाला विरोध करणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात असे व्हायला लागले तर ही धोक्याची घंटा आहे. कोणतीही कलाकृती जिवंत राहिली पाहिजे.- संदीप पाटील, दिग्दर्शक, दशक्रिया 

टॅग्स :entertainmentकरमणूकMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे