बोलवलं तर गृहमंत्र्यांच्या मतदारसंघातही अभिनय शिकवायला जाईन 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 02:51 PM2020-01-22T14:51:24+5:302020-01-22T14:53:31+5:30

सोमण यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत वक्तव्य करणाऱ्या गांधींवर टीका करणारा व्हिडीओ अपलोड केला होता. त्यावर काँग्रेसकडून टीकात्मक प्रतिक्रिया उमटल्या  होत्या. इतकेच नव्हे तर गृहमंत्री देशमुख यांनी 'सोमण यांची या पदावर काम करण्याची पात्रता नसल्याचे सांगितले होते'.

If invited, I will also teach acting in the constituency of the Home Minister ; Yogesh Soman | बोलवलं तर गृहमंत्र्यांच्या मतदारसंघातही अभिनय शिकवायला जाईन 

बोलवलं तर गृहमंत्र्यांच्या मतदारसंघातही अभिनय शिकवायला जाईन 

googlenewsNext

पुणे : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर सोशल मीडियातून टीका केल्यावर मुंबई विद्यापीठातील नाट्यशास्त्राचे विभागप्रमुख योगेश सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. याच मुद्द्यावर सोमण यांच्यावर टीका करणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांना त्यांनी प्रत्यत्तर दिले असून मी बोलवलं तर गृहमंत्र्यांच्याही मतदारसंघात अभिनय शिवायला जाईन असे ते म्हणाले. 

सोमण यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत वक्तव्य करणाऱ्या गांधींवर टीका करणारा व्हिडीओ अपलोड केला होता. त्यावर काँग्रेसकडून टीकात्मक प्रतिक्रिया उमटल्या  होत्या. इतकेच नव्हे तर गृहमंत्री देशमुख यांनी 'सोमण यांची या पदावर काम करण्याची पात्रता नसल्याचे सांगितले होते'. आता त्यावर सोमण यांनी टोला लगावत उत्तर दिले आहे. ते पुण्यात शिवसेनेतर्फे आयोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना शिवसेनेच्या कार्यक्रमातील सहभागाविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले की, ' संबंध व्यक्तींसोबत असतात, पक्षासोबत नाहीत. जर गृहमंत्र्यांनी त्यांच्या मतदारसंघात अभिनय शिकवायला बोलावलं तरी जाईन. मी माझ्या विचारांवर ठाम असून माझे म्हणणे सत्यशोधक समितीसमोर मांडेन. आत्तापर्यंत विद्यापीठाने मला अधिकृतपणे काहीही कळवले नसून .मलाही सर्व काही वर्तमानपत्र किंवा माध्यमातून समजले अशा शब्दात त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. 

यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :

  •  सक्तीच्या रजेवर कमेंट करणार नाही, माझं अधिकृत म्हणणं सत्यशोधक समितीसमोरच बोलेन.
  • मी माझ्या विचारांवर ठाम आहे. प्रत्येकाची लढाई एकट्याची असते ती लढलीच पाहिजे 
  •  असहिष्णुता त्यांच्याबाबत आहे, माझ्या नव्हे. मी सावरकरांचे विचार व्यक्त केले.
  • संबंध व्यक्तींसोबत असतात, पक्षासोबत नाहीत. जर गृहमंत्र्यांनी त्यांच्या मतदारसंघात अभिनय शिकवायला बोलावलं तरी जाईन.

Web Title: If invited, I will also teach acting in the constituency of the Home Minister ; Yogesh Soman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.