शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
2
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
3
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
4
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
5
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
6
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
7
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
8
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
9
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
10
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
11
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
12
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
13
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
14
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
15
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
16
व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
17
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
18
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
19
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
20
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण

राजा चुकत असेल तर प्रजाही चुकतेच आहे! : फादर फ्रान्सिस दिब्रिटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 1:51 PM

आपणच आपला नाश ओढवून घेत आहोत.

ठळक मुद्दे ‘लोकमत’ कार्यालयाला भेट

पुणे : ‘‘राजा चुकतो आहे हे खरेच. मात्र प्रजाही चुकतच आहे. आपणच आपला नाश ओढवून घेत आहोत. रेल्वे रुळांच्या मध्ये घाण टाकायला ‘राजा’ येत नाही. रस्त्यांवरुन वाहने बेदरकारपणे चालवणारे कोण असते? यामुळे होणाऱ्या अपघातांमधून होणारे मृत्यू म्हणजे दहशतवादच नव्हे काय? हे कोणी शेजारचा शत्रू येऊन करत नाही. पर्यावरणाची आपल्याला काळजी नाही. ही सुंदर वसुंधरा फक्त आपलीच नाही, तर आपल्याला पुढच्या पिढ्यांचीही आहे. याची जाणीव कोण ठेवतो,’’ असे प्रश्न ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी उपस्थित केले.अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच ‘लोकमत’ला भेट दिली. यावेळी त्यांनी संपादकीय विभागाशी दिलखुलास संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ‘वसुधैैव कुटुंबकम’ किंवा ‘हे विश्वचि माझे घर’ असे आपण केवळ म्हणतो; पण, प्रत्यक्षात तसे वागतो का? सध्याची लढाई श्वासाची झाली आहे. आपल्या निष्काळजीपणामुळे आपण येणाºयापिढ्यांचे भवितव्य अंध:कारमय करत आहोत. युनोमध्ये १६ वर्षांची मुलगी पर्यावरणाचे प्रश्न मांडते आहे, पर्यावरणाची लढाई लढते आहे. पाठ्यपुस्तकात हा विषय समाविष्ट झाला पाहिजे. मुलांनी तो वाचला पाहिजे आणि तशी कृती केली पाहिजे. ते म्हणाले, ‘यत्र विश्वम भवति एक नीडम हेच’ आजचे ब्रीद आहे. हे विश्वच आपले घर झाले पाहिजे. पर्यावरणाचा प्रश्न ही सध्या सर्वात महत्वाची समस्या आहे. सध्या जे काही घडत आहे, ते ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आहे. ‘करितो चिंता विश्वाची’ असे रामदास स्वामी म्हणाले होते. आताच्या परिस्थितीत खरोखरच जगाची चिंता करण्याची वेळ आलेली आहे. जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता तरी पर्यावरणाचा गांभीर्याने विचार करा! आपणच आपला नाश ओढवून घेत आहोत, परिसर अस्वच्छ करत आहोत. खराब रस्त्यांमुळे होणारे अपघात, रेल्वेमधून पडून होणारे मृत्यू हाही ‘दहशतवाद’च नाही का? दहशतवाद आपणही निर्माण करत आहोत. साहित्य आणि जीवनाचा खूप जवळचा संबंध आहे. माणूस संकटात असताना त्याचे प्रतिबिंब साहित्यात उमटले पाहिजे. तरुण कवींच्या वास्तवादी कविता आपल्याला अस्वस्थ करतात. त्यांच्याकडून खूप आशा आहेत. खेड्यापाड्यातही मराठीचे कोंब फुटत आहेत. आदिवासी लिहू लागले आहेत, दलितांनी मराठी साहित्यात नवे दालन खुले केले आहे. साहित्यिकांनी कायम खरे बोलावे, त्याने कोणाचे मिंधे असू नये. खरे लिहायला घाबरतो तो साहित्यिक नाहीच, असे फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी केले.                मला धमक्यांचे काहीच वाटत नाही. आंदोलनात असताना मी अशा अनेक धमक्या झेलल्या आहेत.  मला विरोध करणा-यांचे मी स्वागत करतो. कारण, तेही माझे मित्र आहेत. विनोबा म्हणायचे, ‘जो सर्वांचा बंधू, तो हिंदू!’ मला सर्वधर्मीयांचे खूप प्रेम मिळाले आहे. संवाद हीच प्रत्येक समस्येमधील गुरुकिल्ली आहे. राजकीय पातळीवरही संवादातून प्रश्न सुटतात. अटल बिहारी वाजपेयींनी अशाच संवादाला सुरुवात केली होती.     प्रत्येकाला व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आहे आणि ते जपले पाहिजे. आपल्याला पटले नाही तरी चालेल, पण ऐकून घ्या. सगळे आपल्याच मनाप्रमाणे झाले पाहिजे, असे वाटणे म्हणजे एकाधिकारशाही आहे. एकाधिकारशाहीतून आपण देशाला कोठे घेऊन जाणार आहोत? राजकारण्यांना पक्ष वाचवायचा आहे की देश वाचवायचा आहे? देश वाचला तर माणूस वाचेल. आपण चौैकाचौैकात पुतळे उभारतो. परंतु, दुष्काळामुळे माणसांचे पुतळे होतात, त्याचे सांगाडे झाले, हे का विसरतो? काष्ठाचे, शिल्पाचे पुतळे उभे करुन आपण लोकांना फसवत आहोत का, याचा राजकारण्यांनी विचार करावा. चौकटमी हिंदूही आणि भारतीयही’    ‘‘मी हिंदूही आहे आणि भारतीयही. फादर ब्रम्हबांधव उपाध्याय यांनी १००-१२५ वर्षांपूर्वी एक सिध्दांत मांडला की, माझा साधना धर्म ख्रिस्ती आहे आणि समाजधर्म भारतीय! सर्व धर्मांनी हे मान्य केले पाहिजे. आपल्या सर्वांचा समाजधर्म हा भारतीय आहे. देश टिकला तरच धर्म टिकेल. रोमन कॅथलिक चर्चमध्ये प्रचंड बदल होत आहेत. आधुनिक काळाशी जोडून घेतले जात आहे. १९६५ पासून चर्चमधील मुख्य उपासना प्रादेशिक भाषेत होतात. वसईतील चर्चमध्येआता रविवारच्या उपासना मराठी भाषेत होतात. महाराष्ट्रात मराठी ही आमची धर्मभाषा आहे.’’- फादर फ्रान्सिस दिब्रिटो 

देवरसांची भेट    ‘‘बाबरी मशीद प्रकरणानंतर एकदा माझे विदर्भ साहित्य संघामध्ये व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. मी तेव्हा बाळासाहेब देवरसांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि ती पूर्णही झाली. आम्ही भेटलो; मी त्यांना म्हणालो, ‘आपली मते वेगवेगळी आहेत, परंतु गैैरसमजही आहेत. आपण चर्चा करुया, बोलूया. आपल्याला सर्वांना जगायचे आहे, देश मोठा करायचा आहे. आपण सर्वजण एकत्र आलो तर एकीचे बळ निर्माण होईल.’ संघाला राष्ट्रभावना वाढीस लावायची आहे, हे कौैतुकास्पद आहे. त्यासाठी सर्वसमावेशक झाले पाहिजे. आजच्या जगात मैैत्रीशिवाय जगणे अशक्य आहे. सर्वजण समान आहेत. धर्म. तत्वज्ञान, राजकारणामध्ये संवाद असला पाहिजे,’’असे फादर दिब्रिटो म्हणाले. त्यांनी सांगितले, असे कीमहात्मा गांधींची १५० वी जयंती साजरी केली जात आहे. गांधींनी जगाला अहिंसेचा संदेश दिला. ‘मला १२५ वर्षे जगायचे आहे’, असे ते म्हणायचे. मग, गांधीजींना जगण्याचा अधिकार का मिळाला नाही? त्यांची जगण्याची संधी का हिरावून घेण्यात आली? सध्या हिंसेने जगाला पोखरले आहे. माणसे विचारानेही हिंसक होत आहेत. पटत नाही त्याला शिव्या द्यायच्या, हे चुकीचे नाही का? सत्याला मरण नाही आणि असत्याला भविष्य नाही. आजही अहिंसेनेच जग जिंकता येते. -----------------वाचक शहाणा आहे    ‘‘वि.स.खांडेकर, पु.ल.देशपांडे हे माझे तेव्हापासूनचे आवडते लेखक. ह.ना.आपटे, बाबा पदमजी, रेव्हरंड नारायण वामन टिळक, दया पवार यांचे साहित्यही मी खूप वाचले आहे. सध्याच्या काळातील रावसाहेब कसबे, रंगनाथ पठारे, प्रज्ञा दया पवार यांचे लिखाण मला आवडते. चांगले साहित्य कायमच काळाच्या कसोटीवर टिकते, वाचक शहाणा आहे. लेखक लेखणीतून सामाजिक परिवर्तनाचा लढा लढत असतो. साहित्यिक, कवी समाजाचे भाष्यकार असतात.  ज्यांना लिहिता येत नाही, ते चळवळीच्या माध्यमातून लढा देतात. वर्तमानपत्रांनी चळवळीच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. चळवळीनेही पथ्य पाळली पाहिजेत,’’असे फादर फ्रान्सिस दिब्रिटो म्हणाले.

--------------------

टॅग्स :PuneपुणेMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनGovernmentसरकारliteratureसाहित्य