Pune Metro: शुक्रवारी मेट्रो सुरु न केल्यास अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन; पुणे काँग्रेसचा इशारा
By राजू हिंगे | Published: September 26, 2024 03:49 PM2024-09-26T15:49:45+5:302024-09-26T15:50:30+5:30
राजकारण बाजूला ठेवून मेट्रोचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करून शिवाजीनगर ते स्वारगेट हा भुयारी मेट्रो मार्ग नागरिकांसाठी खुला करावा
पुणे : जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मेट्रोच्या मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. मात्र मोदी यांचा पुणे दौरा रदद झाला आहे. शिवाजीनगर ते स्वारगेट भुयारी मार्ग आज सुरू झाला नाही तर शु्क्रवारी या मार्गाचे औपचारिक उदघाटन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात येईल. या मार्गावर मेट्रो सुरू न केल्यास मेट्रो अधिका०यांच्या दालनात आंदोलन करण्याचा इशारा कॉग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी आमदार रविंद्र धंगेकर, माजी शहराध्यक्ष ॲड. अभय छाजेड, माजी नगरसेवक अजित दरेकर, रफिक शेख, शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष संगिता तिवारी आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे मेट्रोच्या टप्प्याटप्प्याच्या उद्घाटना येत आहेत या कार्यक्रमांमुळे कोट्यावधींचा चुराडा होत आहे. हा रद्द झाला असला तरी कोट्यावधींचा चुराडा या दौऱ्याच्या निमित्ताने झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या कार्यालयात बसून हे उद्घाटन करता आले असते यापूर्वी देखील त्यांनी अशा प्रकारे उद्घाटन केली आहे. आता राजकारण बाजूला ठेवून मेट्रोचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करून शिवाजीनगर ते स्वारगेट हा भुयारी मेट्रो मार्ग नागरिकांसाठी खुला करावा आणि पुन्हा एकदा कार्यक्रम घेऊन लोकांच्या पैशाचा चुराडा करू नये अशी मागणी सरकारकडे धंगेकर यांनी केले आहे. मेट्रोमध्ये जे पक्षीय राजकारण सुरू आहे. ते अत्यंत निंदणी आहे. काँग्रेस पक्षाने मेट्रोचा डीपी आर केला. मेट्रोची सुरुवात देखील काँग्रेसने केली मात्र कधीही जाहिरात बाजी केली नाही. त्यामुळे आता भाजप सरकारने ही जाहिरातीवर होणारा खर्च टाळावा आणि टप्प्याटप्प्याच्या उद्घाटनासाठी पंतप्रधानांना उद्घाटनांना न बोलावता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या हस्ते हे उद्घाटन करावीत असे धंगेकर यांनी सांगितले.
मोदीं यांना विचारले दहा प्रश्न
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारताना भष्ट्राचार झाला आहे. त्यामुळे केवळ माफी मागुन प्रश्न मिटले का ? राज्यात रोज २१ महिलावर बलात्कार होत आहेत. त्यामुळे लाडकी बहिण सुरक्षित का नाही ? २० हजार ७६२ प्रकरणासह महाराष्ट्र मुलांवरील गुन्हयामध्ये पहिल्या क्रमांकारवर आहे. बदलापुर सारख्या घटनाकडे तूमचे सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मुल खरंच सुरक्षित आहेत ? गेल्या दहा वर्षात राज्यातील २० हजारापेक्षा जास्त शेतक०यांनी आत्महत्या केल्या आहेत. तुमच सरकार हे संकट का सोडवु शकत नाही ? पुणे पोर्श प्रकरण आणि बावनकुळे हिट ॲन्ड रन प्रकरणात हे दिसले की तुमच्या सरकारने तुमच्या मित्रांना गुन्हापासुन दुर ठेवले. तलाठी घोटाळ आणि नीट घोटाळा हे फक्त हिमनगाचे टोक आहे. तुमच्या काळात अजुन किती घोटाळे समोर येणार आहेत. ?बरोजोगारामुळे महाराष्ट् तरूणांच्या आत्महत्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. राज्याच्या इतिहासातच प्रथमच २७ महपालिकांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे तुमच्या सरकारने निवडणुक न घेउन लोकशाहीचा गळा घोटला आहे असे दहा प्रश्न आमदार रविंद्र धंगेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारले आहेत.