'देशवासियांना पहिल्यांदा लस दिली असती, तर गंगेत मृतदेह दिसले नसते' नाना पटोलेंची केंद्रावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 02:16 PM2021-07-23T14:16:26+5:302021-07-23T14:20:55+5:30
देशातील १३० कोटी जनतेला २६० ते ३०० कोटी लसची गरज होती. पण केंद्र सरकारने पुण्यात तयार झालेली लस पाकिस्तानला पाठवली
पुणे: कोरोनावर लसीचे दोन डोस प्रभावी असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे. तसेच दोन डोस घेतलेल्या लोकांना कोरोना झाला तरी धोका नसल्याचे निदर्शनास आले आहे. पश्चिमात्य देशात लसीकरण वेगाने सुरु आहे. यासंदर्भात बोलताना नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
पटोले म्हणाले, ''देशातील १३० कोटी जनतेला २६० ते ३०० कोटी लसची गरज होती. पण केंद्र सरकारने पुण्यात तयार झालेली लस पाकिस्तानला पाठवली. दुश्मन देशाला लस देण्यापेक्षा आपल्या देशाला दिली असती. तर गंगेत मृतदेह दिसले नसते. अशी सनसनाटी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर केली आहे''. पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
आजही आपण लसीबाबत जागतिक पातळीवर ऐकत आहोत. की लस झाल्यावर ही कोरोना होतो. फक्त जीव वाचतो आणि त्रास होत नाही. त्यावरून लस १०० टक्के सुरक्षित असल्याचं त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या काळात अनेक जण बेरोजगार झाले. व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने देशालाही आर्थिक संकटाना सामोरे जावे लागले आहे. त्यावर भाष्य करत पटोले म्हणाले, ''कोरोनाकडे सुरुवातीपासूनच केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे. सद्यस्थितीत देशाची आर्थिक परिस्थिती गंभीर झाली आहे. या सगळ्याबाबत नरेंद्र मोदी जबाबदार आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले. ''