पालिकेने इको-हाऊसिंग प्रोजेक्ट योजनेंतर्गत २००८ साली रेन हार्वेस्टिंग, गांडूळखत आणि सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी मिळकत करामध्ये सुट देण्याची योजना सुरू केली होती. मिळकत करामध्ये १० टक्के सूट देण्यास सुरुवात करण्यात आली. शहरात पाहता पाहता या प्रकल्पांची संख्या १० हजारांपर्यंत गेली आहे. पालिका प्रशासनाने डिसेंबर २०२० मध्ये या प्रकल्पांच्या केलेल्या पाहणीदरम्यान अनेक प्रकल्प बंद असल्याचे समोर आले होते.
मिळकतकर विभागाने जानेवारी महिन्यात अशाच ३ हजार ८१ मिळकतधारकांना नोटीसा दिल्या असून सवलत बंद करण्यात येत असल्याचे कळविले होते. या सोसायट्यांची २०२१-२२ ची मिळकतकरातील सवलत रद्द करण्यात येणार आहे.
------
ज्या मिळकत धारकांनी योजनेचा फायदा घेतला आहे आणि प्रकल्प बंद पडलेले आहेत अशा अशा मिळकत धारकांची सवळत रद्द करण्यात येणार आहे. सध्या शहरामध्ये १० लाख ८१ हजार मिळकती आहेत. यापैकी ८ लाख मिळकतींना निवासी आहेत. व्यावसायिक मिळकतींची संख्या १ लाखापेक्षा अधिक आहेत. सर्वेक्षणामधून आढळून आलेल्या त्रुटी पाहून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
- डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका