पुणे: रूग्णाला घेऊन नातेवाईकांना शहरामध्ये बेडसाठी हॉस्पिटलांच्या दारात वणवण फिरावे लागत आहे, माहिती अपडेट ठेवणारा साधा डॅशबोर्डही महापालिकेला करता येत नसेल तर राजीनामे देऊन बाजूला व्हा, अशी टीका काँग्रेसने महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीवर केली.
पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी शहरातीलआरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघत असल्याची खंत व्यक्त करत भाजपाचे पदाधिकारीच याला जबाबदार असल्याचा आरोप केला. सातसात दिवस त्या डँशबोर्डमध्ये माहिती अद्ययावत केली जात नाही. घरी संगणकावर बोर्ड पाहिला की कुठे जागा.आहे ते समजायला हवे. तंत्रज्ञानामुळे हे सहज शक्य आहे. मात्र ते नसल्याने आधीच धास्तावलेल्या नागरिकांचे आणखी हाल.होत आहेत असे तिवारी म्हणाले.
शहराच्या अशा असाधारण स्थितीमध्येही कोथरूडचे विद्वान आमदार आम्ही २ हजार बेड देणार वगैरे घोषणा करत आहेत यावरूनही तिवारी यांनी संताप व्यक्त केला. यांना सर्वांना पुणेकरांनी मते दिली.आहेत ती संपुर्ण शहरासाठी म्हणून दिली. २ हजार बेड करा नका करू, शहराची आरोग्य व्यवस्था कशी सुधारेल याकडे लक्ष द्या, तूमच्या जवळच्या मोजक्याच नागरिकांचा विचार करणार की संपुर्ण पुणेकरांचा याचे जाहीर ऊत्तर द्या अशी मागणी तिवारी यांनी केली.
डॅशबोर्ड रोजच्या रोज अपडेट करा, त्याचा वापर करण्याविषयी नागरिकांना आवाहन करा, शहरातील सगळी आरोग्य व्यवस्था सुधारेल असे निर्णय घ्या असे आवाहन तिवारी यांनी केले. संकटातही राजकीय फायदा ऊठवण्याचा प्रयत्न निंद्य आहे व भजापाच्या चंद्रकांत पाटील यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी नेमके तेच करत आहेत असे तिवारी म्हणाले. काहीच जमत नसेल तर मग राजीनामे द्या, प्रशासनाला त्यांचे काम करूद्या असे आवाहन त्यांनी केले।