पुणे : राज ठाकरे यांच्या भोंगे बंद करण्याच्या भूमिकेनंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. त्यांनी दिलेल्या अल्टिमेटममुळे पुण्यात धार्मिक स्थळांवर स्पीकर वाजवण्यासाठी सुद्धा रितसर परवानगी घ्यावी लागत आहे. राज ठाकरेंची सभा, महाआरती हा राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांच्या या भोंग्यांच्या भूमिकेनंतर महाविकास आघाडीकडूनही जोरदार टीकाही होऊ लागली आहे.
त्यातच जर भोंगे, स्पीकर मुळे राज ठाकरे यांना त्रास होत असेल तर प्रथम स्वतःच्या सभेतील स्पीकर बंद करून भोंगे, स्पीकर शिवाय सभा करावी असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अल्पसंख्यक विभाग, प्रदेश संघटक सचीव हलिमाताई शेख यांनी पुण्यातून दिला आहे. जर पुन्हा कुणाच्या सामाजिक भावना दुखावल्या गेल्या तर याला जिम्मेदार सभेस परवानगी देणारे पोलीस प्रशासन असेल असेही त्या यावेळी म्हणाल्या आहेत.
तर राज्यभर मोर्चा काढू
औरंगाबाद येथील मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या सभेला पोलीसांनी सशर्त परवानगी दिली असली तरी अटी व नियमांचे पालन होईल याची काळजी घ्यावी जर सभेत किंवा सभेनंतर अणूचीत प्रकार घडला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अल्पसंख्यक विभाग राज्यभर निषेधार्थ तीव्र मोर्चा काढेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.