शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

Ramdas Athawale: ठाकरे - फडणवीस यांच्यातला वाद मिटला नाही तर पुढचा मुख्यमंत्री मी - रामदास आठवले

By अजित घस्ते | Published: August 01, 2024 3:26 PM

उद्धव ठाकरेंनी मनातील चीड काढून टाकावी, पुन्हा एकदा दोघांची मैत्री व्हावी अशी आमची इच्छा

पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) वर्सेस देवेंद्र फडणवीस वाद सुरू आहे. राजकारणात विरोधक देखील असतात. माझी दोघांनाही विनंती आहे. दोघांनाही राजकारणात राहिलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना फोडले असं नाहीये. मला वाटतंय राजकारणात दोघेही राहतील. उद्धव ठाकरेंनी मनातील चीड काढून टाकावी. पुन्हा एकदा दोघांची मैत्री व्हावी अशी आमची इच्छा आहे. मात्र यांच्यातील वाद मिटला नाही तर पुढचा मुख्यमंत्री मी आहे असे विधान केंद्रीय समजकल्याण मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) व्यक्त केले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त सारसबाग परिसरात मातंग समाज समन्वय समिती पुणे यांच्यातर्फे अभिवादन सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी केद्रीय समाजकल्याण मंत्री आठवले यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले यावेळी समाज माध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त केले.

देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष आनंदाची बाब 

भाजपच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड होणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. याबाबत आठवले म्हणाले, महाराष्ट्र हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे.त्या सध्याचे अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ संपत आलेला आहे. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने नितीन गडकरींचा नंबर लागला होता. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा विचार होतोय. देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली तर आनंदाची गोष्ट आहे.

अण्णा भाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ ची मागणी 

लोकशाही अण्णा भाऊ साठे यांना 'भारतरत्न' पुरस्कार देण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. अण्णाभाऊंना भारतरत्न मिळण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार असून, लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार आहे.

टॅग्स :PuneपुणेRamdas Athawaleरामदास आठवलेUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीAmit Shahअमित शाह