व्यवस्थेला प्रश्न केले नाहीत तर तयार हाेतात अंधभक्ताच्या फाैजा; अमोल कोल्हेंचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 03:07 PM2023-05-22T15:07:51+5:302023-05-22T15:08:06+5:30

शिवचरित्रातून समाजमनाची बांधणी व्यवस्थित झाली तर त्यावर कुठल्याही आघाताचा काहीही परिणाम हाेणार नाही

If the system is not questioned, then the blind devotees are ready Opinion of Amol Kolhe | व्यवस्थेला प्रश्न केले नाहीत तर तयार हाेतात अंधभक्ताच्या फाैजा; अमोल कोल्हेंचे मत

व्यवस्थेला प्रश्न केले नाहीत तर तयार हाेतात अंधभक्ताच्या फाैजा; अमोल कोल्हेंचे मत

googlenewsNext

पुणे : इतिहासाकडे चिकित्सक वृत्तीने बघण्याची सवय लावून घ्यावी. विचारधारेला प्रश्न विचारले नाहीत तर मेंढराचे कळप तयार हाेतात आणि व्यवस्थेला प्रश्न विचारले नाहीत तर अंधभक्ताच्या फाैजा तयार हाेतात. त्यामुळे इतिहासाची डाेळसपणे चिकित्सा झाली पाहिजे. शिवछत्रपतींवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट, मालिका तयार केली पाहिजे, असे मत अभिनेते खासदार डाॅ. अमाेल काेल्हे यांनी व्यक्त केले.

कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या महासम्राट या कादंबरी मालिकेच्या ‘रणखैंदळ’ या दुसऱ्या खंडाचे प्रकाशन डाॅ. काेल्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी मेहता पब्लिशिंग हाउसचे अखिल मेहता उपस्थित हाेते.

डाॅ. काेल्हे म्हणाले, ‘कादंबरी, नाटकं, महानाट्य, मालिका, चित्रपट यातून इतिहास आपल्यासमोर यायला हवा. शिवचरित्र हे केवळ सात घटनांपुरते मर्यादित नसून त्याची व्याप्ती खूप माेठी आहे. शिवचरित्रातून समाजमनाची बांधणी व्यवस्थित झाली तर त्यावर कुठल्याही आघाताचा काहीही परिणाम हाेणार नाही. इतिहासामुळे आत्मभान येते, तसेच आपला स्वाभिमान जागृत हाेताे आणि त्यातून राष्ट्राची निर्मित्ती हाेत असते.’

पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या ध्यासाचा, अभ्यासाचा आणि काळजाचा विषय आहे. त्यामुळे ही कादंबरी लिहीत आहे. मला संशाेधन मांडायचे हाेते; पण जनसामान्यांसाठी कादंबरी लिहित आहे. माझी ही कादंबरी आचार्य अत्रे यांना अर्पण करीत आहे. कर्नाटकात शहाजी महाराजांची विदीर्ण अवस्थेतील समाधी पाहून महाराष्ट्रात भूकंप हाेईल, असे वाटले हाेते. पण, दुर्दैवाने तसे झाले नाही, अशी खंतही पाटील यांनी व्यक्त केली. नेताजी पालकर यांच्यावर महानाट्य लिहून तयार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: If the system is not questioned, then the blind devotees are ready Opinion of Amol Kolhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.