शहरं
Join us  
Trending Stories
1
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
2
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
3
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
4
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
5
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
6
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
7
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
8
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
9
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
10
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
11
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
12
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
13
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
14
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
15
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
16
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
17
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
18
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
19
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
20
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत

.....अशी माणसे असतील तर बदल होणारचं असा विश्वास वाटतो:  डॉ. बाबा आढाव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 7:44 PM

नाटक संपल्यानंतर देखील निळूभाऊ आणि डॉक्टर हातात झोळी आणि पंचा घेऊन लोकांसमोर उभे राहिले....

ठळक मुद्देडॉ. श्रीराम लागू किंवा निळू फुले यांच्यासारखी माणसे जाण्यामुळे पोकळी ही जाणवत राहणार

पुणे: डॉ. श्रीराम लागू हे सामाजिक कृतज्ञता निधीचे संस्थापक अध्यक्ष होते. हा निधी १९८९ पासून सुरू झाला. राज्यात लग्नाच्या बेडी नाटकाचे ५० प्रयोग करून डॉ. लागू, निळू फुले, सुहास जोशी, रोहिणी हट्टंगडी यांनी 25 लाख रूपयांचा निधी जमविला. समाजात जी काम करणारी मुले आहेत. जी कोणत्याही राजकीय पक्षांशी निगडित नाहीत, अशा कार्यकर्त्यांना मानधन दिले जावे यासाठी ही निधीची योजना होती. डॉ. लागू यांना ही कल्पना इतकी आवडली की त्यांनी ती उचलून धरली. नाटकातल्या भूमिका जशा त्यांनी मन लावून केल्या तशा सार्वजनिक जीवनातील जबाबदारी देखील त्यांनी तितक्याच समरसतेने उचलली. नाटक संपल्यानंतर देखील निळूभाऊ आणि डॉक्टर हातात झोळी आणि पंचा घेऊन लोकांसमोर उभे राहिले.  त्यावेळी हजारो रुपये जमले. एखाद्या कामात समर्पित होऊन काम करण्याची त्यांच्यात वृत्ती होती. दोघांवरही सेवादलाचे संस्कार होते. डॉ. लागू यांच्या सामाजिक कार्याचे आणखी एक मोठेपण म्हणजे त्यांनी केलेला सत्याग्रह. शनी शिंगणापूरला महिलांना प्रवेश नव्हता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सत्याग्रह करण्याचे ठरविले. त्यामध्ये डॉ. लागू यांनी पुढाकार घेतला. डॉ. एन.डी पाटील, डॉ. नरेंद्र दाभोळकर, डॉ. लागू, निळू फुले सर्वजण नगरला जमले आणि तिथून सत्याग्रहाची तुकडी निघाली. तेव्हा पोलिसांनी लगेच अटक केली. तिथल्या पोलीस कोठडीत आम्हाला ठेवण्यात आले. दुस-या दिवशी आम्हाला न्यायालयात हजर करणार होते. डॉ. लागू तयारीनीशी आले होते. न्यायालयात ते बसून होते. डॉ. लागू यांनी सत्याग्रह करणं ही आमच्यासाठी आश्चर्यकारक होते. लोक सहानुभूती दाखवतात. मायेचा हात फिरवतात. परंतु प्रत्यक्षात कृतीमध्ये सहभागी होणं. शांततामयी सत्याग्रहात भाग घेणं हे तितक सोपं नाही. आज त्यांची आठवण होते की शबरीमाला प्रकरणाचे अजून काही झाले नाही. डॉ. लागू यांच्यासारखी समाजधुरिणी, कलावंत मंडळी जेव्हा भाग घेतात तेव्हा प्रश्न सुटायला मदत होते. आणीबाणी विरोधात ही कलावंत मंडळी उभी राहिली होती. या माणसांसारखी माणसं जेव्हा कामाला पाठिंबा देतात. तेव्हा विश्वास वाटतो की बदल होणारचं. डॉ. नरेंद्र दाभोळकर, डॉ. श्रीराम लागू किंवा निळू फुले यांच्यासारखी माणसे जाण्यामुळे पोकळी ही जाणवत राहाणार. राजकीय पद मिळविण्यापेक्षा सामाजिक बदलांसाठी काम करणं अधिक महत्वाचं आहे. ------------------------------------------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेBaba Adhavबाबा आढावShriram Lagooश्रीराम लागूNilu Phuleनिळू फुले