पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहारत कुठलेही नवे निर्बंध लावणार नाही. मात्र गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी अंदाज घेऊन जर गर्दी होते असं लक्षात आल्यास दुसऱ्या दिवसापासून लागलीच कठोर निर्बंध लावण्यात येतील. पुण्यात कोरोना आढाव बैठकीनंर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्यात ग्रामीण भागात कोरोना नसल्यासारखं नागरिक वागू लागले आहेत. त्यांनी काळजी घेणं गरजेचं असल्याचंही पवार यावेळी म्हणाले आहेत. लसीकरणात महाराष्ट्र अग्रेसर आहे. पण अजून अनेक नागरिकांचे लसीकरण झाले नाही. राज्याकडून जास्तीत जास्त लसीकरण वाढवण्यावर भर दिला जात असल्याचं ते यावेळी म्हणाले आहेत.
इंधन दरवाढीबाबत केंद्रावर टीका
दहा महिन्यापासून राजधानी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. मात्र, मोदी सरकारकडून याची कोणतीही दखल घेतली जात नाही. हे जनतेचं दुर्दैव आहे. अशी टीका करतानाच इंधन दरवाढीवरुन अजित पवार यांनी मोदी सरकारला खडे बोल सुनावले. कोरोनामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना इंधन दरवाढीचा फटका बसत आहे. ते नियंत्रित करण्यासाठी केंद्राकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही, असी टीका अजित पवार यांनी केली.
तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊनच शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय
तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार तयार आहे. सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना आधिक धोका असवल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. त्यानुसार तयारी केली जात आहे. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊनच शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
मंदिरं उघडण्याच्या मागणीवरुनही टीकास्त्र
"काही लोक मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन करत आहेत. पण मंदिराचा मुद्दा हा राजकीय हेतूनं आहे. केंद्र सरकारनंही सांगितलं आहे की खबरदारी घ्या, मग हे राजकारण कशासाठी करताहेत", असा सवाल अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला.