शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

‘बेदरकार’वाहन चालविल्यास करिअरला अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 2:08 AM

तब्बल ९० गुन्हे दाखल : ७५ गुन्ह्यांमध्ये झाली शिक्षा; कलम २७९ व २८३ नुसार कारवाई

पुणे : वाहनचालकांच्या बेदरकार वृत्तीला लगाम घालण्यासाठी पोलिसांनी गुन्ह्यांची मात्रा वापरण्यास सुरुवात केली आहे. दत्तवाडी पोलिसांनी चार महिन्यांमध्ये भादंवि कलम २७९ आणि २८३ नुसार केलेल्या कारवायांमध्ये तब्बल ९० गुन्हे दाखल केले आहेत. यातील ७५ गुन्ह्यांमध्ये शिक्षा झाली आहे. यामुळे बेदरकार वाहनचालकांच्या करिअरमध्ये अडथळा येऊ शकतो.

पुणे शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांवर वेडीवाकडी वळणे घेत सुसाट जाणारे वाहनचालक पाहायला मिळतात. उरात धडकी भरविणारा त्यांचा वेग पाहून सर्वसामान्यांना अक्षरश: थिजल्यासारखे होते. यासोबतच रस्त्यावर कुठेही वाहन उभे करण्याचे प्रकारही सर्रास सुरू आहेत. यामुळे अपघातांची शक्यता वाढते. या वाहनचालकांवर कारवाई करण्यामध्ये मनुष्यबळाअभावी वाहतूक पोलिसांनाही मर्यादा येत आहेत. स्थानिक पोलिसांनाही याप्रकारे गुन्हे दाखल करण्याचे अधिकार आहेत. मात्र, त्याचा फारसा वापर होताना दिसत नाही.पुणे महापालिकेच्या मैला वाहून नेणाऱ्या वाहनावर दत्तवाडी पोलिसांनी अशाच प्रकारची कारवाई केली होती. नो एंट्रीमधून बेदरकारपणे गाडी चालवत अन्य लोकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी सज्जन विजय खाडे (रा. म्हसवड, ता. माण, सातारा) याच्याविरुद्ध कलम २७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. अवघ्या चार तासांत आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यामध्ये न्यायालयाने खाडेला १२०० रुपयांचा दंड आणि कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली होती. ही घटना १७ सप्टेंबरला घडली होती.अशा प्रकारे आतापर्यंत दत्तवाडी पोलिसांनी विविध रस्त्यांवर कारवाई करीत ८० गुन्हे दाखल केले आहेत. यातील ७५ आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. या सर्वांना न्यायालयाने प्रत्येकी १२०० रुपयांचा दंड आणि कोर्ट उठेपर्यंतशिक्षा सुनावली आहे. या वाहनचालकांना एकूण ९० हजारांचा दंड झालेला आहे.भविष्यात होऊ शकते अडचण निर्माणवाहतूक नियमभंगाबद्दल गुन्हा दाखल झाल्यास विद्यार्थ्यांना आणि तरुणांना भविष्यात अडचणी येऊ शकतात. पासपोर्ट आणि अन्य कामांसाठी पोलीस पडताळणीच्या वेळी अडचणी येऊ शकतात. दाखल गुन्ह्यांमुळे करिअरला अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक वाहन चालविणे आवश्यक असल्याचे घेवारे यांनी सांगितले.वाहनचालकांनी बेदरकारपणे; तसेच ओव्हरस्पीडने वाहन चालवू नये. नो एंट्री आणि विरुद्ध बाजूने येणे टाळावे. रस्त्यावरून ज्येष्ठ नागरिक, महिला, गरोदर महिला, लहान मुले जात असतात. तसेच, अन्य वाहनचालकांनाही तुमच्या चुकीमुळे प्राण गमवावा लागू शकतो किंवा कायमचे अपंगत्व येऊ शकते. त्यामुळे स्वत:सोबत इतरांचा जीव धोक्यात घालू नका; अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. गुन्हा दाखल झाल्यास पुढे सर्वच गोष्टींमध्ये अडचणी निर्माण होतात. घाई न करता वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघातांची संख्या कमी होईल आणि वाहतुकीला शिस्तही लागेल.- देविदास घेवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दत्तवाडी पोलीस ठाणे283कलम४सार्वजनिक रस्त्यावर धोकादायक पद्धतीने वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, अन्य प्रवाशांना धोका निर्माण करणे या कारणासाठी आर्थिक दंडाची तरतूद असून न्यायालयाद्वारे शिक्षाही होऊ शकते.279कलम४मानवी जीवितास धोका, दुखापत, नुकसान होईल अशा पद्धतीने सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालविणे. या गुन्ह्यासाठी कडक शिक्षा होऊ शकते. दोषी वाहनचालकास सहा महिन्यांपर्यंतची कैद, आर्थिक दंड अथवा दोन्ही अशा स्वरूपाची शिक्षा होऊ शकते. 

टॅग्स :Puneपुणेbikeबाईक