Kirit Somaiya: अजित पवारांच्या घोटाळ्यावर वेबसिरीज काढली तर रॉयल्टी म्हणून त्यांना २०० ते ३०० कोटी सहज मिळतील
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 03:27 PM2021-10-13T15:27:31+5:302021-10-13T15:35:23+5:30
पवार कुटुंबियांच्या ५७ कंपन्यापर्यंत आमची टीम पोहोचली आहे. या कंपन्यात पवार कुटुंबियांची नामी बेनामी मालमत्ता आहेत. अजित पवार आणि कुटुंबियांवर आयकर विभागाची सुरू असलेली कारवाई हिंदुस्थानातील सर्वात मोठी कारवाई आहे.
पुणे : पवार कुटुंबियांच्या ५७ कंपन्यापर्यंत आमची टीम पोहोचली आहे. या कंपन्यात पवार कुटुंबियांची नामी बेनामी मालमत्ता आहेत. अजित पवार (ajit pawar) आणि कुटुंबियांवर आयकर विभागाची सुरू असलेली कारवाई हिंदुस्थानातील सर्वात मोठी कारवाई आहे. भिंतीत, बेसमेंट आणि मोकळ्या जागेत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी काय काय सापडले आहे ते लवकर कळेल. अजित पवार यांच्यावर वेबसिरीज काढायची असेल तर त्यांना २०० ते ३०० कोटींची (royalty) मिळेल. पुण्यात पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या (kirit somaiya) बोलत होते.
''अजित पवार आणि पवार कुटुंबियांचा हिशोब मी आज मांडणार आहे. जरंडेश्वर आणि इतर कारखान्यात कोण कोण भागीदार आहे ते मी आज सांगणार आहे. जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी विक्रीत घोटाळा झाला आहे हे न्यायालयानेही सांगितले. या कारखान्यात अजित पवार सर्वेसर्वा होते. अजित पवार यांनी स्वतः त्या कारखान्याची विक्री केली आणि स्वतः तो इतर कंपनीच्या माध्यमातून विकत घेतला. हे सर्व करताना त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.''
''अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी आयकर विभागाच्या धाडी सुरू आहेत. पहिल्या दिवशी त्यांनी भावूक स्टेटमेंट दिले. मी पवार कुटूंबीयांना विचारू इच्छितो की, मोहन पाटील, नीता पाटील आणि विजया पाटील हे कोण आहेत हे त्यांनी सांगावे. हे तिघेही अजित पवारांच्या वेगवेगळ्या कंपन्यात पार्टनर आहेत. आणि अजित पवार सांगतात माझ्या बहिणीच्या घरी आयकर विभागाचे अधिकारी का गेले. बहिणीच्या नावाने बेनामी मालमत्ता अजित पवारांनी उभ्या केल्या आहेत असंही ते म्हणाले आहेत.''