दौंड : महाराष्ट्र राज्याची महिला मुख्यमंत्री झाली म्हणजे महिलांचे प्रश्न सुटतील असे नाही तर मुख्यमंत्री पुरुष असो किंवा महिला सर्व जनतेचे प्रश्न सुटणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
दौंड येथे वयोश्री योजनेच्या कार्यक्रमानिमित्त त्या आल्या होत्या त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी महिला असतानाही संबंधित राज्य छेडछाड मुक्त होऊ शकले नसल्याचा दाखलाही त्यांनी दिला. मी महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री होईल की नाही हा नंतरचा भाग आहे. तुर्त तरी मी राष्ट्रवादी काँग्रेसकडे बारामती लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मागितलेली आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.आरक्षणाला पाप की योजना म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता विधानसभां निवडणुकांमध्ये पराभव झाल्यावर लोकसभा निवडणुकीआधी सवर्णांना आरक्षण देत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सुळे म्हणाल्या की, जीएसटीला आमचा विरोध नाही मात्र जीएसटीच्या अंमलबजावणी प्रक्रियेला माझा विरोध आहे. परिणामी उद्योग आणि व्यापार व्यवसाय डबघाईस आला आहे. यानिमित्त दौैंड येथे वयोश्री योजनेंतर्गत ज्येष्ठ अपंगांसाठी मोफत साहित्यांचे वाटप आणि त्यांची आरोग्य्य तपासणी करण्यात आली. या शिबिराला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवसभरात साधारणत: १0 हजारांच्या जवळपास रुग्णांनी हजेरी लावली असा अंदाज दौैंड तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार, शहराध्यक्ष गुरुमुख नारंग यांनी व्यक्त केला.