पुण्यात कनि महिला मंच आयोजित कनि पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. यावेळी अरविंद जगताप यांच्यासह पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, पत्रकार प्रशांत अनासपुरे, कनि मंचच्या कल्याणी कदम आणि निलिमा अलुलकर आदी उपस्थित होते. यावेळी प्रतिभा जाधव (हेड कॉन्स्टेबल, पुणे शहर), अर्चना मोरे (सिनिअर क्राईम रिपोर्टर, पुणे मिरर), छाया जगताप (सिनिअर सिस्टर नायडू हॉस्पिटल), मुक्ता पाडेकर (वंदेमातरम संघटना), जयश्री अब्राहम(रिक्षा ड्रायवर) आणि हिरा गव्हाणे(सफाई कर्मचारी) आणि कोरोना काळातील मदतीबद्दल बाळासाहेब दाभेकर यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल कनि पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
अरविंद जगताप म्हणाले, पुरुष आत्महत्या करतात.मात्र तुलनेने स्री आत्महत्येचा विचार करत नाही,कारण ती अधिक कणखर असते. अनाथ आश्रमात जाऊन केक कापून वाढदिवस सेलिब्रेट करण्यापेक्षा या मुलांना नेमकी कशाची मदत हवी आहे याचा अधिक विचार करावा.
आपण प्रत्येकाने माणुसकी जपली पाहिजे, गरजूंना मदतीचा हात दिला पाहिजे अशी भावना पुरस्कार्थी प्रतिभा जाधव, छाया जगताप, मुक्ता पाडेकर, आरती मोरे यांनी व्यक्त केली. युवा तरुणी आणि महिलांना एकत्र घेऊन एकीने उपक्रम राबवणार असल्याचा मानस कल्यानी कदम आणि नीलिमा अलुलकर यांनी व्यक्त केला. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.