शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

बॅंकेशी लिंक असलेला मोबाईल मुलांच्या हाती देत असाल तर...सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 4:10 AM

ourdeepak@gmail.com अबीर हा चौथीपासूनच मोबाईल वापरण्यात तरबेज होता. विविव पेड गेम्ससुद्दा वेगळ्या साईटवर जाऊन क्रॅकवर्जन डाऊनलोड कसे करायचे यात ...

ourdeepak@gmail.com

अबीर हा चौथीपासूनच मोबाईल वापरण्यात तरबेज होता. विविव पेड गेम्ससुद्दा वेगळ्या साईटवर जाऊन क्रॅकवर्जन डाऊनलोड कसे करायचे यात तर माहीरच. त्यामुळे सोसायटीतील मोठी मुले सुध्दा त्याच्याकडे विविध गेम्स डाऊनलोड करून घ्यायला यायची. अबीरच्या या मोबाईल नॉलेजचं त्याच्या मम्मी-पप्पांनाही भारीच कौतुक त्यामुळे त्यांच्या पप्पांनी त्याला स्वतंत्र मोबाईलच घेऊन दिला होता. शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या ओझसला मात्र त्याच्या मम्मी-पप्पांकडून अगदी काही वेळच दिला जायचा. त्या दिवशी रविवारचा दिवस होता आणि ओझसच्या पप्पांना सुट्टी होती म्हणून ती संधी साधत अबीरचं घर गाठायचं आणि त्याच्याकडील चार-पाच गेम्स त्याच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करायचा चंग बांधला. एका गेमसाठीतर तीनशे रुपये ऑनलाईन पेमेंट करण्याची परवानगीही पप्पांकडून मिळवली. तडक अबीरचं घर गाठलं आणि अबीरकडून पहिल्यांदा पेड गेम्सचे काही क्रॅकव्हर्जन डाऊनलोड करून घेतले, त्याचवेळी ५०० रुपयांची गेम ५० रुपयांत मिळवा अशी एक फसवी जाहिरात स्क्रीनवर आली आणि दोघांनाही तो मोह आवरला नाही. ओझसच्या परवानगीनेच अबीरने त्या जाहिरातीवर क्लीक करत मोबाईल मधील बॅकेंचे डिटेल्स टाकले, कंपनीकडून आलेला ओटीपी त्याच मोबाईलवर आला आणि त्याच क्रमांकाने बॅंक अकाउंटही लिंक होते, त्यामुळे अबीरने ओटीपी टाकताच काही वेळात मोबाईलवर बॅंकेतील ५० हजारांची रक्कम लंपास झाली. बॅंकेचा मेसेजही आला तेव्हा मात्र ओझसची भंबेरी उडाली आणि त्याने भीतीने त्यांनी तासभर घरी जायचे टाळले आणि तासाभराने तो मेसेज डिलीट करत मोबाईल पप्पांकडे सुपूर्द केला. थेट दुसऱ्या दिवशी पप्पांनी काही कारणानिमित्त गुगलपे चेक केला तर बॅंक अकाउंट झीरो झालेला. ओझसच्या पप्पांना अकाउंट झीरो कशाने झाला ते कळेच ना.. बॅंकेत फोन केल्यावर रविवारी सकाळी अकराच्या सुमारास बॅेकेतली सारी रक्कम ट्रान्सफर झाल्याचा सुगावा लागला त्यावेळी मोबाईल ओझसकडे होता, हे कळाल्यावर मग ओझसला विचारणा झाली आणि मग ओझसने घडलेलेा किस्सा पप्पांना सागंतिला. पोलीस केस झाली मात्र ना रक्कम मिळाली ना कोणाकडे रक्कम ट्रान्सफर झाली त्याचा सुगावा लागला.

अशीच घटना तुमच्या घरातही घडू शकते. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि बॅंकेचे अकाउंटला लिंक असलेला किंवा गुगल पे, फोन पेसारख्या ॲप असलेला आणि मुलांना त्याचा पासवर्ड माहीत असेल तर तसा मोबाईल मुलांच्या हाती ट्रॅन्झॅक्शनसाठी देणे शक्यतो टाळाच. देशभरात मुलांच्या गेम्सच्या मध्यमातून अनेक फ्रॉड कंपन्यांनी अनेकांचे बॅंक अकाउंट साफ केल्याचा घटना घडल्या आहेत. त्याची दखल घेतल पोलिसांनीही पालकांसाठी काही मार्गदर्शनक टिप्स दिल्या त्यापैकी सर्वांत महत्वाची टिप म्हणजे मुलांसाठी मोबाईल घेतला असेल तर ते शक्यतो सिमलेस द्या आणि इंटरनेसाठी वाय-फाय वापरा किंवा मग हॉटस्पॉटव्दारे त्याच्या मोबाईलला नेटवर्क द्या. म्हणजे त्याच्या मोबाईलवर ना कोणता ओटीपी येईल ना बॅंकेचे डिटेल्स जातील.

मुलांच्या हाती मोबाईल देताना या टिप्स जरूर फॉलो करा.

सिमलेस मोबाईल द्या

प्ले स्टोरवरील पॅरेंटल कंट्रोल सेंटिंग ऑन करा

बॅंकेशी लिंक असलेला मोबाईल शक्यताे मुलांना देऊच नका

पैशांच्या ट्रॅन्झॅक्शन संबंधित ॲप्सचे पासवर्ड मुलांना सांगू नका

मुलांकडून पैशांची ट्रॅन्झॅक्शन करण्याची सवलत देऊ नका जसे मोबाईल रिजार्च, वीजबिल व इतर पेमेंट करणे

पासवर्ड बच्चों को न बताएं। खासकर तब जब आपके बैंक खाते में जुड़े मोबाइल नंबर की ही सिम मोबाइल सेट में उपयोग हो रही हो।

तुमच्या बॅंकेतील पैसे ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आल्यास पहिल्यांदा घरातील सद्स्यांकडून त्यांनी काही व्यवहार केले का? याची खात्री करा

घरातील व्यक्तींकडून व्यवहार झाला नसेल व रक्कम ट्रान्सफर झाली असेल तर तातडीने पोलिसांना कळवा किंवा www.cybercrime.gov.in संपर्क करा