पुणे : शहरातील बहुचर्चित कात्रज-कोंढवा रस्त्यावरील अपघाताचे सत्र अदयापही सुरू आहे. या रस्त्यावर गेल्या १२ तासात दोन अपघात होउन दोन जणांचा बळी गेला आहे. आठवडयाभरात चार अपघातामध्ये चार जणाचे बळी गेले आहेत. पाच वर्षांत या साडेतीन किलोमीटरच्या रस्त्यावर ५८ हून अधिक अपघात झाले आहेत. त्यामध्ये २६ जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्याचे रूंदीकरण कधी करणार? आणखीन किती अपघात होण्याची वाट पालिका प्रशासन, वाहतुक पोलिस आणि आरटीओ पाहणार आहेत का असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
कोंढवा पोलिस स्टेशनच्या हद्दीत आरएमडी शाळेसमोर दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात पती-पत्नीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ५ आगस्ट रोजी रात्री एका युवकाचा कटनेरच्या मागच्या चाकाखाली जाउन मृत्यू झाला होता. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील कोंढवा स्मशानभूमीजवळ १० आगस्ट रोजी पुन्हा भीषण अपघात झाला. यामध्ये आठ वाहने एकमेकांवर आदळली. यात स्कूल बसचाही सामावेश होता. या अपघातात एक जण ठार झाला असून पाच व्यक्ती गंभीर जखमी झाल्या होत्या. कात्रज कोंढवा रस्त्यावर १३ ऑगस्ट रोजी रात्री १०च्या सुमारात एका ज्येष्ठ महिलेचा अपघातात मृत्यू झाला. १४ ऑगस्ट रोजी कोंढवा स्मशानभुमीजवळ खचलेले चेंबर आणि एमएनजीएलचे रस्त्यात खचलेले लोखंडी झाकण याला हुकविताना शेजारी चाललेल्या पादचा०यांला धक्का लागून एका ज्येष्ट नागरिकांचा मृत्यू झाला. या रस्त्यावर गेल्या १२ तासात दोन अपघात होउन दोन जणांचा बळी गेला आहे. आठवडयाभरात चार अपघातामध्ये चार जणाचे बळी गेले आहेत.
राज्यातील सत्ताधारी, पालिका प्रशासनाचे या रस्त्याकडे दुर्लक्ष
कात्रज-कोंढवा ८४ मीटरचा डीपी रोड आहे. या कामाला ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी मान्यता दिली आहे. हा रस्ता राजस सोसायटी ते खडी मशीन चौक ते पिसोळी पालिका हद्दीपर्यंत आहे. या रस्त्यांच्या कामाला २४१ कोटी दिले असून आतापर्यंत ४८ कोटी रुपये खर्च झाले आहेत. या रस्त्यांच्या भूसंपादनासाठी ७१० कोटींची आवश्यकता होती. पण, भूसंपादन न झाल्यामुळे या रस्त्याचे काम रखडले आहे. राजस सोसायटी ते कपिलामृत डेअरीपर्यंत रस्ता झाला आहे. त्यापुढे या रस्त्याचे काम झालेले नाही. खडी मशीन चौकाच्या अलीकडे भुयारीमार्गाचे काम सुरू आहे. पण त्यापुढेही काम झालेले नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करूनही सलग काम न झाल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. त्यातच आता भूसंपादनामुळे पांढरा हत्ती ठरलेल्या आणि दीर्घ काळ रेंगाळलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याची रुंदी कमी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पूर्वीच्या ८४ मीटरऐवजी आता त्याची रुंदी ५० मीटर केली जाणार आहे. यामध्ये सेवा रस्त्याचा समावेश आहे. मात्र, अद्यापही या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. या रस्त्यासाठी २०० कोटी रूपये भुसंपादनासाठी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर विधानसभेच्या अधिवेशनात पुरवणी मागण्यामध्ये २०० कोटी रूपये या रस्त्यासाठी मंजुर करण्यात आले आहे. पण या रस्त्यासाठी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवेसेनेच्या शिंदे गटाच्या राज्यस्तरीय नेत्यांने बैठक घेतली नाही. त्यामुळे राज्यातील सत्ताधा०याचे या रस्त्याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
जड वाहनांना वेळेचे बंधन घाला
कात्रज-कोंढवा रस्त्याची महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ८ ऑगस्ट रोजी पाहणी केली. शहरात कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी तातडीने भूसंपादन करा. जागा ताब्यात आल्यानंतर तातडीने काम सुरू करा, असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले होते. रस्त्याचे काम वेगाने करणा०या बरोबरच या रस्त्यावर आता जड वाहनांना वेळेचे बंधन घालण्याची मागणी नागरिक करत आहेत.