किरण शिंदे
पुणे - भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवड शहरात शनिवारी रात्री शाई फेकण्यात आली होती. या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी या घटनेनंतर बंदोबस्तावर असलेल्या 10 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. यामध्ये एक पोलीस निरीक्षक दोन पोलीस उपनिरीक्षक आणि इतर कर्मचारी आहेत. यावर आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रतिक्रिया आली असून त्या पोलिसांना निलंबित करू नका तर त्यांची बदली करा अशी मागणी त्यांनी केली.
चंद्रकांत पाटील म्हणाले, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हात जोडून विनंती केली आहे की बदली करणे वेगळे पण निलंबित करू नका. या घटनेत पोलिसांचा दोष असेलच असे नाही. कारण व्यवस्थित नियोजन करून हा प्रकार घडला आहे. तरीही पोलिसांचा दोष असला तरी निलंबित न करता त्यांची बदली करण्यात यावी. निलंबन झाले तर त्यांचे कुटुंब डिस्टर्ब होईल.
दरम्यान काल झालेल्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. या घटनेत पत्रकार, आंदोलक आणि पोलीस जे कोणी सहभागी असतील त्या सर्वांवर कारवाई केली जाईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सक्षम आहेत ते योग्यच निर्णय करतील. माझा पक्ष आणि सरकार जे करतील ते मला मान्य आहे. कार्यकर्त्यांना देखील कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले असल्याचे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान काल झालेला प्रकार पूर्वनियोजित होता. त्याची संपूर्ण लिंक सापडली आहे. यामध्ये काही पत्रकार असून त्यांना पण अटक झाली आहे. हा पूर्वनियोजित कट संपूर्णपणे उलगडला पाहिजे. आणि यातील आरोपींवर योग्य ती कलम लागली पाहिजे असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगित