पुणे : प्रत्येक सकाळ ही नवा दिवस घेऊन येते असे सांगितले जाते. मात्र सकाळी कामे होत नाहीत किंवा घाई झाल्याने उशीर झाला , एखादी वस्तू विसरली की मग मात्र चिडचिड होते. हे टाळायचे असेल तर रात्री काही कामे करून ठेवली तर सकाळचा वेळ तर वाचेलच आणि चिडचिडही टाळता येईल.
उद्याचे कपडे ठरवा आणि तयार करा :
अनेकांना सकाळी कपडे ठरवून मग इस्त्री करायची सवय असते. मात्र हे सगळं करण्यात सकाळी वेळ जातो, घाई होते, महिलांना मॅचिंग वस्तूही सापडण्यात उशीर होतो. त्यापेक्षा आदल्या रात्री उद्याचा ड्रेस आणि मॅचिंग काढून ठेवा आणि कमाल बघा. दिवसाच्या सुरुवातीला होणारी तारांबळ टाळता येईल.
फोन चार्ज करा :
अनेकदा राञभर फोन चार्जिंगला लावला तर खराब होतो म्हणून अनेकजण सकाळी हे काम करतात. पण सकाळी येणारे फोन यामुळे फोन पूर्ण चार्ज होत नाही. यावर उपाय म्हणजे रात्री काहीवेळ फोन चार्ज करा.यामुळे सकाळी चार्ज नाही झाला तरी काम अडणार नाही.
चाव्या जागेवर ठेवा :
अनेकांना घरी गेल्यावर गॉगल आणि चावी कुठेही टाकायची सवय असते. सकाळी निघताना लागणाऱ्या या महत्वाच्या गोष्टी वेळही जातो आणि मूडही. त्यामुळे आठवणीने या वस्तू जागेवर ठेवा आणि रात्री त्या जागेवर आहेत ना हे तपासासुद्धा.
पाण्याची बाटली भरून ठेवा :
रात्री झोपण्यापूर्वी सकाळची काही कामे करून ठेवली तर वेळ कमी जातो. त्यामुळे पाण्याची बाटली आवर्जून भरून ठेवा. तोच डबा न्यायचा असेल तर घासून ठेवायलाही हरकत नाही.
सकाळी पेट्रोल भरणे टाळा :
बहुतांश लोकांना सकाळी ऑफिसला जाताना गाडीत पेट्रोल भरायचे असते.पण सकाळी पंपावर प्रचंड गर्दी असते. त्याने वेळ जाऊन उशीर होतो. त्यापेक्षा घरी यायला उशीर झाला तरी चालेल पण रात्री येताना पेट्रोल भरा.