पुणे : खारफुटीची जंगलं ही अत्यंत महत्त्वाची आहेत. ती कमी होत असल्याने पाऊस झाला की, तिथे पूरस्थितीचा सामना करावा लागतो. मुंबई, कोकण या भागांत समुद्र किनारपट्टीवर ही जंगलं आहेत. पण बांधकामांमुळे खाड्या बुजवल्या गेल्या, काही ठिकाणी लोकांची वस्ती वाढली, अशा अनेक कारणांमुळे ही जंगलं कमी होत आहेत. उलट या जंगलांमुळेच आपले संरक्षण होते, त्याची माहिती लोकांपर्यंत पोचावी म्हणूनच हा दिन साजरा केल्या जात असल्याची माहिती खारफुटी वनांचे अभ्यासक डॉ. महेश शिंदीकर यांनी दिली.
युनोस्कोने २०१५ मध्ये २६ जुलै हा जागितक खारफुटी परिसंस्था संवर्धन दिन साजरा करण्यास परवानगी दिली. खारपुटी वाचवावी म्हणून ग्रीन पिस या संस्थेने पुर्वी आंदोलने केली. या चळवळीचा मुख्य सूत्रधार डॅनियल मॅनोटो हा होता. त्यांचे निधन २६ जुलै रोजी झाले. त्यानंतर संघटनांनी त्याच्या स्मृतीप्रीत्यार्थ हा दिन साजरा करावा, अशी मागणी केली होती. मग २०१६ पासून हा दिन साजरा होत आहे.
सखल भागातील किनारपट्टीची शहर आहेत. महाराष्ट्रातील नद्या पश्चिमेकडे वाहतात. आपल्या सह्याद्रीत अनेक नद्या उगम पावतात आणि अरबी समुद्रात जातात. समुद्राला मिळण्याच्या ठिकाणी अनेक शहरे वसली आहेत. पुर्वी दळणवणाचे साधन पाणीच होते. म्हणून किनारपट्टीवर घरं झाली. त्यातून कळत नकळत खाजण वने नष्ट होत गेली. तिथे भराव घातले गेले. नद्यांचे प्रवाह वळवले. हे होत गेले आणि सखल भागात पाणी येऊ लागले. आता जो पूर येतो आहे, त्याला ही वने नष्ट होणं हे कारण आहे.
-------------------------
मुंबईत ब्रांद्रा, कुर्ला खाडीचा भाग होता. खाडीचे पाणी पसरायला तिथे जागा होती. पाणथळ भूमी होती. ती भूमी पाण्याचा साठा नियंत्रित करते. आता खाड्या बुजवल्या, बांधकामे झाली. तिथे कचरा टाकला जातो. त्यामुळे सखल भागात पाणी जाऊन पुराचा फटका बसत आहे.
- डॉ. महेश शिंदीकर, संशोधक, खारफुटी वने
----------------------
नुकताच काही संशोधकांनी जगरातील वीस किलोमीटर किनारपट्टी असणाऱ्या भागांचा अभ्यास केला. शास्त्रीय साधने वापरून हा अभ्यास केला. खारपुटी वनांमुळे जे किनाऱ्याचे रक्षण झाले, त्याचा त्यांनी आर्थिकदृष्ट्या अभ्यास केला आणि सुमारे साडेसहा हजार कोटी रूपयांचे नुकसान या वनांमुळे झाल्याचे लक्षात आले. ही वने नसती, तर आतापर्यंत खूप मोठे नुकसान झाले असते, असे प्रा. शिंदीकर म्हणाले.
-------------------
खारफुटी नष्ट होण्याची कारणे
खारफुटीची झाडे - झुडपे किनारी दलदलीत पाय रोवून उभी राहात असल्याने समुद्राचे आक्रमण थोपवणे, किनारी जमीन क्षारयुक्त (खारपड) होण्यापासून वाचवणे, इतर जैवविविधतेला अधिवास पुरवणे, पुराचे पाणी तसेच मोठ्या लाटांपासून मानवी वस्तीला संरक्षण देणे अशी अनेक कामे ती करतात. नैसर्गिकरीत्या कार्बन शोषण्याची सर्वाधिक क्षमता खारफुटीमध्ये आढळते. परंतु, किनारी प्रदेशातील बांधकामे, भराव टाकणे, प्रदूषण यांसारख्या कारणांनी खारफुटी नष्ट होत आहे, असे शिंदीकर म्हणाले.